नवी दिल्ली | सोशल मीडियावर अनेक खोटे आणि चुकीचे मेसेज फॉरवर्ड करण्याचे प्रमाण वाढताना दिसत आहेत. या गोष्टींना आळा घालण्यासाठी व्हॉट्सअॅपप्रमाणेच फेसबुकने आता मेसेज फॉरवर्ड करण्यावर मर्यादा घातली आहे. फेसबुक युजरला आता मेसेंजरवर जास्तीत जास्त ५ लोकांना मेसेज पाठवता येईल. यामुळे चुकीच्या गोष्टींवर आळा बसेल, असं फेसबुकने म्हटले आहे.
फेसबुक मेसेंजरचे व्यवस्थापक आणि संचालक Jau Sullivan यांनी सांगितले, “सध्या जागतिक स्तरावर कोरोना संकटाच्या काळात चुकीचे मेसेज थांबवणे, हे सर्वात मोठे आवाहन आहे. यात काही प्रमाणात फेसबुक चुकीच्या गोष्टींना थांबवण्याचा प्रयत्न करत आहे.” पुढे बोलताना ते म्हणाले, “या वर्षी अमेरिका आणि न्यूझीलंडमध्ये निवडणुका आहेत. तिथेही सोशल मीडियावर चुकीचे मेसेज फॉरवर्ड करणे, हा सर्वात मोठा मुद्दा आहे. त्यामुळे फेसबुकने निवडणुकीच्या आधीच सर्व तयारी पूर्ण केली आहे.”