Categories: Featured व्हायरल व्हिडिओ

अहो फडणवीस साहेब “जो बूंद से गयी वो हौद से नहीं आती”

कोल्हापूर। कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे एकीकडे देशाचे पंतप्रधान कोई भी रोड पर ना निकले म्हणत देशवासियांना घराबाहेर पडू नका असे आवाहन करत आहेत. तर दुसरीकडे त्यांच्याच पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मात्र लोकांना रस्त्यावर उतरण्याचे आवाहन करत असल्याचा व्हीडीओ सोशल मिडीयावर व्हायरल केला जात आहे. परंतु या व्हीडीओची लोकशाही न्यूजने पडताळणी केली असता या व्हीडीओचं वेगळंच सत्य समोर आलयं.

देवेंद्र फडणवीस यांनी लोकांना ५ एप्रिलला रात्री ९ वाजता दिवे लावण्याचे आवाहन करण्यासाठी  (३ एप्रिल) एक व्हीडीओ शेअर केला. या व्हीडीओमध्ये त्यांनी लोकांना आपल्या घरामध्ये अंधार करून आपल्या गच्चीवर, रस्त्यावर, आपल्या दारावर.. आपल्याला हातामध्ये लाईट, टॉर्च, मोबाईलचा दिवा मेणबत्ती घेऊन उभं राहण्याचं आवाहन केलं आहे. सदरच्या व्हीडीओ मध्ये रस्त्यावर हा शब्द वापरण्यात आल्याने झपाट्याने हा व्हीडीओ व्हायरल झाला आणि काहीवेळात त्यांच्यावर टीका सुरू झाली. एकीकडे सर्वसामान्य नागरिकांना प्रशासन आणि खुद्द मोदीजी रस्त्यावर उतरू नका असे आवाहन करत असताना फडणवीसांनी केलेली ही चूक लोकांची दिशाभूल करणारी असल्याचे आणि कोरानाचे गांभिर्य नसल्याचेच दाखवून देणारी असल्याचे लोकांचे म्हणणे आहे.

फडणवीसांनी केलेली ही चूक त्यांच्या ध्यानात आल्यावर ट्विटर अकाऊंटवरून आज ५ एप्रिलला सकाळी १०.५२ वाजता नवीन व्हीडीओ शेअर केलाय. या मध्ये त्यांनी रस्त्यावर हा शब्द ‘एडीट’ करून आपली चूक सुधारण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु म्हणतात ना.. “जो बूंद से गयी वो हौद से नहीं आती“, तशी अवस्था आता फडणवीसांची झाली असून व्हायरल व्हीडीओ वरून त्यांच्यावर जोरदार टीका होताना दिसत आहे. 

Rajendra Hankare