Categories: गुन्हे

सावधान : कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांच्या नावे ‘या’ ईमेल आयडीवरून पाठवले जात आहेत बनावट संदेश

कोल्हापूर | कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांच्या नावे बनावट संदेश आणि मेल पसरवण्याचे प्रमाण वाढले अाहे. यामुळे लोकांच्यामध्ये गैरसमज निर्माण होत असून असाच प्रकार सध्या executivedirector4182@gmail.com या ई-मेल आय डी वरुन खोटे ई-मेल पाठवून केला जात आहे. परंतु अशा ईमेलवर कोणीही विश्वास ठेवू नये, असा खुलासा जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी केला आहे.

executivedirector4182@gmail.com या ईमेल आयडीवरुन I need a favor from you please email me back as soon as possible असे खोटे ई-मेल पाठविले जात आहेत. त्याला कोणीही प्रतिसाद देवू नये असेही देसाई यांनी सांगितले आहे.

खोटे ई-मेल पाठवणाऱ्यावर कारवाई करण्याची सूचना पोलिसांना देण्यात आली आहे, असे जिल्हाधिकारी देसाई यांनी म्हटले आहे.

Team Lokshahi News