e-tractor
शेतीसाठी यांत्रिककरणाची मदत घेण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. शेतकरी आता मशागतीसाठीही यंत्रांचा वापर करताना दिसतात. शेतीच्या यांत्रिकरणामध्ये सर्वाधिक वापरले जाणारे यंत्र म्हणजे ट्रॅक्टर. नांगरणी आणि इतर विविध कामांसाठी ट्रॅक्टरचा वापर मोठ्या प्रमाणात होत असतो. परंतु दिवसेंदिवस इंधनांचे दर गगनाला भिडत असल्याने शेतकऱ्यांच्या खिशाला कात्री बसते. ट्रॅक्टर म्हणा किंवा इतर वाहने त्यांच्या इंधनावरतीच सर्वाधिक खर्च करावा लागतो. परंतु आता बाजारात असे ट्रॅक्टर येत आहेत जे आपला पैसा आणि वेळही वाचवणार आहेत. याआधी ईलेक्ट्रिक बस, कारविषयी आपण ऐकलं किंवा वाचलं असेल पण आता बाजारात ईलेक्ट्रिक ट्रॅक्टरही येत आहेत. या ट्रॅक्टरमुळे आपला इंधनावर होणारा मोठा खर्च आणि वेळ या दोन्ही गोष्टी वाचणार आहेत.
काय फरक आहे डिझेल – नॉर्मल ट्रॅक्टर आणि ई-ट्रॅक्टरमध्ये
इलेक्ट्रिक ट्रॅक्टर उत्पादक
सेलेस्ट्रियल ई-मोबिलिटीचे सह-संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सिद्धार्थ दुराराजन या ट्रॅक्टरविषयी बोलताना म्हणाले की, हे ट्रॅक्टर शेतकऱ्यांचा ऑपरेटिग खर्च वाचवते. एका तासाला लागणारा १५० रुपयांचा खर्च कमी होऊन हा फक्त २५ ते ३० रुपये लागणार आहे. शेतकऱ्यांना फायदेशीर ठरणारा ई- ट्रॅक्टर लवकरच भारतीय बाजारपेठांमध्ये उपलब्ध होईल. भारतीय शेतकऱ्यांसाठी ट्रॅक्टर घेणे हे फार आव्हानात्मक गोष्ट असते. कारण ट्रॅक्टर घेण्यासाठी लागणारा खर्च आणि ऑपरेटिंगसाठी लागणारं मनुष्यबळ आदी गोष्टी ह्या आव्हानात्मक असतात. पण शेतकरी बांधव आता ट्रॅक्टर खरेदी करु शकतील कारण ई-ट्रॅक्टरची किंमत ही इतर ट्रॅक्टरपेक्षा कमी असल्याचेही दुराजन म्हणाले. नियमित ट्रॅक्टरची किंमत ही साधारण ६ लाख रुपये आहे. परंतु या ई- ट्रॅक्टरची किंमत ५ लाख रुपये असणार आहे. शिवाय तासाचा ऑपरेटिंग खर्च हा फक्त २५ ते ३० रुपये येणार आहे.
Special features of e-tractor ई-ट्रॅक्टरची वैशिष्ट्ये