Categories: कृषी

नियमित कर्जदारांनाही लवकरच मिळणार प्रोत्साहन पर अनुदान!

मुंबई | महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील उर्वरित थकबाकीदार शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीची प्रक्रिया राज्य सरकारने सुरू केली आहे. यामुळे थकबाकीदार शेतकऱ्यांना पीकर्ज मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. असे असले तरी नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांच्या प्रोत्साहनपर रक्कमेबाबत सरकारने अद्यापही कोणतीच ठोस भूमिका घेतलेली नाही. त्यामुळे नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकरी वर्गात याबाबत संतापाची भावना व्यक्त आहे. 

यासंदर्भात मिळालेल्या माहितीनुसार, थकबाकीदार शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीची प्रक्रिया जुलै अखेर पार पडल्यानंतर, ऑगस्ट ते स्पटेंबर पर्यंत नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ दिला जाण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने शासनस्तरावर प्रक्रिया सुरू असून जिल्हा पातळीवर अशा शेतकऱ्यांची यादी तयार आहे. जुलैनंतर प्रत्येक जिल्ह्यांकडून या याद्या एकत्रित करून ही प्रक्रिया वेगाने पार पाडली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनाही लाभ दिला जाणार असून शासन त्यासाठी बांधिल असल्याचे सांगण्यात येत आहे. 

महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेसाठी महाराष्ट्रातील ३२ लाख शेतकरी पात्र ठरले होते. यापैकी १९ लाख शेतकऱ्यांच्या कर्जखात्यावर मार्च अखेरपर्यंत १२ हजार कोटी रूपये वर्ग करण्यात आलेत, तर निधी अभावी ११ लाख १२ हजार खातेदारांना ८,१०० कोटींचा लाभ देणे अद्याप बाकी होते. या उर्वरित शेतकऱ्यांना ३० जून रोजीच्या शासननिर्णयानुसार निधी देखील वितरीत करण्याचे काम शासनाने सुरू केले आहे. 

Team Lokshahi News

Share
Published by
Team Lokshahi News
Tags: 6000 ruppees PM KISAN SAMMAN YOJANA animal husbandory buy insurance Dairy farming in India dairy farming in Maharashtra Farmer loan get insurance Insurance KISAN SAMMAN YOJANA online crop loan ONLINE PM KIsan PM KISAN LIST PM KISAN LIST 2019 PM KISAN LIST 2020 PM KISAN SAMMAN NIDHI YOJANA PM KISAN SAMMAN NIDHI YOJANA 2019 PRADHAN MANTRI KISAN SAMMAN NIDHI YOJANA 2019 एलजी डायरेक्टरी किसान कॉल सेंटर योजना किसान क्रेडिट कार्ड की वैधता किसान क्रेडिट कार्ड कैसे बनवाएं किसान क्रेडिट कार्ड धारक की मृत्यु किसान क्रेडिट कार्ड नवीनीकरण किसान क्रेडिट कार्ड महाराष्ट्र किसान क्रेडिट कार्ड योजना 2019 किसान क्रेडिट कार्ड हेल्पलाइन नंबर किसान सम्मान निधि योजना पशुपालन पशुपालनासाठी कर्ज पशुसंवर्धन पशुसंवर्धन विभाग पीएम किसान पीएम किसान निधि योजना पीएम किसान पोर्टल पीएम किसान योजना लिस्ट पीएम किसान समाधान योजना पीएम किसान सम्मान निधि योजना पीएम किसान सम्मान योजना लिस्ट पीएम-किसान योजना पीक कर्ज माफ पीक कर्ज व्याज सवलत प्रधानमंत्री किसान निधि योजना फार्म प्रधानमंत्री किसान सम्मान निधि योजना महात्मा फुले कर्ज माफी योजना मोदी सरकार मोदी सरकार की योजना शेतकऱ्यांच्या मदतीसाठी किसान कॉल सेंटर