पुणे | केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचे जावई आणि कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांना अखेर अटक करण्यात झाली आहे. पुणे पोलिसांनी ही कारवाई केली आहे. हर्षवर्धन जाधव यांनी किरकोळ अपघाताच्या वादातून एका वयस्कर दुचाकी स्वाराला मारहाण केली होती. या प्रकरणी जाधव यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला होता. अटक टाळण्यासाठी जाधव यांनी छातीत दुखत असल्याचं कारण सांगितल होत. मात्र, पुणे पोलिसांनी हर्षवर्धन जाधव यांची ससूनमध्ये तपासणी करुन त्यांना रिसतर अटक केली आहे.
पुणे पोलीस जाधव यांना उद्या शिवाजीनगर कोर्टात हजर करणार आहेत. त्यामुळे हर्षवर्धन जाधव यांना आजची (15 डिसेंबर) रात्र तुरुंगातच काढावी लागणार आहे. न्यायालयासमोर हजर केल्यानंतरच त्यांना जामीन मिळणार की नाही हे स्पष्ट होणार आहे. हर्षवर्धन जाधव यांच्याविरोधात खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल आहे. हर्षवर्धन जाधव यांच्यासह इषा झा यांच्याविरोधातही खूनाचा गुन्हा दाखल आहे.
अमन अजय चड्डा यांच्या तक्रारीवरुन या दोघांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पुण्यातील चतुश्रृंगी पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.