Categories: Featured शिक्षण/करिअर

अखेर महापरिक्षा पोर्टल बंद झालं…

मुंबई। नोकर भरतीसाठीचे महापरीक्षा पोर्टल महाविकास आघाडी सरकारने अखेर बंद केल्याने स्पर्धा परीक्षार्थींत आज आनंदोत्सव साजरा झाला. परिक्षार्थींकडून या निर्णयाचे स्वागत करण्यात आले.

परिक्षार्थींच्या हिताचा निर्णय घेतल्याच्या प्रतिक्रिया त्यांच्याकडून व्यक्त झाल्या. महापोर्टलच्या सावळ्या गोंधळाविरोधात तक्रारीचा सूर होता. स्पर्धा परीक्षार्थींनी महापोर्टल बंद करण्यासाठी मोर्चेही काढले होते.

सामूहिक कॉपी, बैठक व्यवस्थेतील ढिसाळपणा, हजेरीत बायोमेट्रिक पद्धत नसणे, डमी उमेदवारांवर कारवाई न होणे, अशा अनेक त्रुटी त्यात आढळल्या होत्या. महाविकास आघाडीच्या सरकारने महापोर्टल बंद केल्याने परीक्षार्थींत समाधान पसरले आहे.

Lokshahi News