Categories: Featured महिला सामाजिक

काकूंच्या ‘त्या’ व्हायरल व्हिडीओची मंत्री यशोमती ठाकूर यांच्याकडून गंभीर दखल; घेतला ‘हा’ महत्वाचा निर्णय

अमरावती | हिशेब न आल्याने कष्टकरी भगिनीची कुणीही खिल्ली उडवू नये. त्यांच्या प्रामाणिक कष्टाची कदर व सन्मान केला पाहिजे. कष्टकरी भगिनींना आर्थिक साक्षर करण्यासाठी महिला व बालविकास विभागाकडून प्रशिक्षण कार्यक्रम राबवू, असे पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी सांगितले आहे.

एका कष्टकरी महिलेला हिशेब येत नसल्याचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत झाला. या व्हिडीओच्या माध्यमातून सामाजिक भान विसरलेल्यांनी प्रामणिकपणे कष्ट करून उदरनिर्वाह करणाऱ्या माताभगिनीची मोठ्या प्रमाणात थट्टा करण्याचे काम केले. परंतु याकडे संवेदनशीलपणे पाहिले पाहिजे. त्यांना आर्थिक साक्षर करून सक्षम करणे ही जबाबदारी सर्वांचीच आहे. महिला व बालविकास विभागातर्फे महिलांमधील आर्थिक साक्षरता वाढविण्यासाठी राज्यात सर्वदूर प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येईल, असे श्रीमती ठाकूर यांनी सांगितले.

महिलांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी विभागाकडून विविध कार्यक्रम राबविण्यात येत आहेत. त्यालाच जोडून असंघटित क्षेत्रातील महिलांमध्ये आर्थिक स्वावलंबनासह साक्षरता कार्यक्रम राज्यभर राबविण्यात येईल, असेही मंत्री श्रीमती ठाकूर यांनी सांगितले.

Team Lokshahi News