Categories: आरोग्य सामाजिक

कोल्हापूर : मास्क न वापरणाऱ्यांना आकारा ५ हजारांचा दंड – मुश्रीफ

कोल्हापूर | कोरोना हा संसर्गजन्य रोग आहे. अनेक लोकांना न्यूमोनिया असून त्यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह येत असली तरी तज्ञांच्या मते ते कोरोनाग्रस्तच असल्याने प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे प्रशासनाच्या सूचनांकडे दुर्लक्ष न करता नागरिकांनी खबरदारी घेण्याची आवश्‍यकता असल्याची कळकळीची विनंती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केली आहे.

जिल्ह्यात कोरोनाचा फैलाव वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी पत्रक प्रसिद्ध केले आहे. संसर्ग झालेले रुग्ण कोणतीही काळजी न घेता इतरांना बाधित करत आहेत. पोलीस प्रशासनाने याबाबत पुढाकार घेऊन मास्क न वापरणाऱ्यांना पोलिसी खाक्‍या दाखवला पाहिजे. तसेच प्रशासनाने कोणाचीही फिकीर न करता, पाच हजारांचा दंड आकारून कारवाई करावी. रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढत असल्याने संसर्ग कमी करण्यासाठी या गोष्टी करणे आवश्यक असल्याचे मुश्रीफ यांनी म्हटले आहे

Team Lokshahi News