Categories: Featured

शेतकऱ्यांना अतिरेकी संबोधणे कंगनाच्या अंगलट; पोलिसांकडून गुन्हा दाखल

मुंबई | केंद्रीय कृषि कायद्याच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना दहशतवादी संबोधणे कंगना राणावतला महागात पडले आहे. शेतकऱ्यांना लक्ष्य केल्याच्या कारणावरून तिच्यावर कर्नाटकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी मंगळवारी (१३ ऑक्टोबर) याबाबतची माहिती दिली आहे.

तुमकुर पोलिसांनी स्थानिक न्यायालयाच्या आदेशानुसार हा गुन्हा दाखल केलाय. तुमकुर न्यायदंडाधिकारी प्रथम श्रेणी (जेएमएफसी)न्यायालयाने ९ ऑक्टोबर रोजी वकील एल. रमेश नाईक यांच्या तक्रारीनुसार पोलिसांना एफआयआर नोंदवण्याचे निर्देश दिलेत. 

कंगणाने आपल्या ट्विटमध्ये, ज्या लोकांनी सीएएबद्दल चुकीची माहिती आणि अफवा पसरविल्यामुळे दंगे घडले तेच लोक आता शेतकरी विधेयकाविषयी चुकीची माहिती पसरवत आहेत आणि देशात दहशत निर्माण करत आहेत, ते अतिरेकी आहेत. मी काय बोलले ते तुम्हाला चांगलेच ठाऊक आहे, परंतु तुम्हाला फक्त चुकीची माहिती पसरवणे आवडते असे म्हणटले होते. 

शेतकरी कायद्याविरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांची तुलना थेट अतिरेक्याशी केल्यामुळे कंगनावर गुन्हा दाखल करण्याचे निर्देश न्यायालयाने दिल्याने शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

Lokshahi News

Share
Published by
Lokshahi News
Tags: kangana ranaut