Categories: Featured

नोकरदार आणि करदात्यांसाठी मोदीसरकारचे ५ महत्वाचे निर्णय

नवी दिल्ली। मोदी सरकारने नोकरदार आणि करदात्यांना दिलासा देत काही महत्वाचे निर्णय घेतले आहेत. याचा देशातील कोट्यावधी नोकर आणि करदात्यांना फायदा होणार आहे. 

  1. नोकरदारांसाठी केंद्र सरकारने विशेष तरतूद करत तीन महिन्यांचा पगाराइतका ईपीएफ खात्यातून काढण्याची मुभा दिली आहे. या रकमेवरील सेवा शुल्कात देखील सूट दिली जाणार आहे.
  2. जीएसटी धारकांना त्यांचे विवरणपत्र भरण्याची कालमर्यादा ३० जून २०२० पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
  3. वैयक्तिक करदात्यांना १८ हजार कोटी रूपयांचा परतावा देण्याची घोषणा करण्यात आली आहे. तसेच ५ लाख रूपयापर्यंतचे प्रलंबित कर परतावा आणि जीएसट/कस्टम परतावा त्वरित जारी केले जातील अशी सूचना कर विभागाने दिली आहे.
  4. प्राप्तीकर विवरणपत्र भरण्यास मुदतवाढ देण्यात आली असून आर्थिक वर्ष २०१८-१९ साठी प्राप्तीकर भरण्यास ३० जून २०२० पर्यंत मुदतवाढ दिली आहे. तसेच उशिरा प्राप्तीकर भरल्यास द्यावे लागणारे व्याज १२ टक्क्यावरून ९ टक्के करण्यात आले आहे.
  5. आधार कार्डला पॅन लिंकिंग करण्याची मुदत वाढवून ती देखील ३० जून २०२० केली आहे.
Lokshahi News