Categories: सामाजिक

कोल्हापूर : पाच महिन्यांचा व्यावसायिक घरफाळा माफ करावा

Lokshahi News Network :
कोरोनाच्या वाढत्या प्रकोपामुळे देशभरात पाच महिन्यांपासून कडक लॉकडाऊन होते. या कालावधीत व्यवसायांचे आतोनात नुकसान झाले असून व्यावसायिक घरफाळा संपूर्णपणे माफ करावा अशी मागणी कर्तृत्व या सामाजिक संस्थेच्या वतीने आज करण्यात आली. या मागणीचे निवेदन कोल्हापूरच्या महापौर निलोफर आजरेकर व आयुक्त मल्लीनाथ कलशेट्टी यांना देण्यात आले आहे.

कोरोनामुळे झालेल्या लॉकडाऊनचा देशभरातील व्यावसायिकांना मोठा फटका बसला आहे. या पाच महिन्यांच्या कालावधीत सर्व व्यवसाय बंद असल्याने जागेचे भाडे, पाणीबिल, कर्मचाऱ्यांच्या पगार, घरफाळा, लाईट बिल आदींचे ओझे वाढले आहे. सर्व व्यवसायांचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले आहे. त्यामुळे लॉकडाऊनच्या एप्रिल ते ऑगस्ट या कालावधीचा आकारण्यात येणारा व्यावसायिक घरफाळा व पाणीपट्टीचा स्थिर आकार माफ करण्यात यावा. अशा आशयाचे निवेदन कर्तृत्व संस्थेच्या वतीने देण्यात आले. यावेळी संस्थेचे संस्थापक विराज सरनाईक, विनीत जिरगे, संजय जाधव, शिवराम नाईक, विशाल शिंदे, शरवली सरनाईक, दिग्विजय निंबाळकर, मनोज लाड उपस्थित होते.

Team Lokshahi News