Categories: Featured कृषी

जगातील ‘पाच’ सर्वात महागडी फळे; किंमत वाचून व्हाल हैराण

जगात अशी काही फळे आहेत ज्यांची किंमत लाखो रूपयांच्या घरात आहे. तुम्हाला जगातील पाच सर्वात महाग फळांविषयी आम्ही सांगत आहोत. चला त्यांची नावे, किंमत आणि लागवड कुठे केली जाते हे जाणून घेऊ…

गार्डन अननस
 • ही अननसाची एक प्रजाती असून याची लागवड इंग्लंडमधील हेलीगनच्या लॉस्ट गार्डनमध्ये केली जाते. एका अहवालानुसार लॉस्ट गार्डनमधील अननस जगातील सर्वात महाग आहेत.
 • हे अननस ग्रीनहाऊसमध्ये घेतले जाते. एका अननसाची किंमत १६०० डॉलर्स (सुमारे १.१४ लाख रुपये) आहे.
तमागो आंबे
 • ही आंब्याची एक प्रजाती आहे. नाव आहे – तमागो आंबा. तमागो म्हणजे ‘एग ऑफ द सन’. वास्तविक हा आंबा मोठा अंड्यासारखा दिसतो.
 • ते जपानमध्ये घेतले जातात. परंतु त्यांची लागवड केवळ ऑर्डर मिळाल्यावरच केली जाते. कारण ते खूप महाग आहे. एका अहवालानुसार हा आंबा सुमारे २.१४ लाख रुपयांना विकला गेला आहे.
डेन्सुक टरबूज
 • हा एक अतिशय खास प्रकारचा टरबूज आहे, जो काळ्या रंगाचा आहे. या टरबूजचे सरासरी वजन सुमारे ११ किलो आहे.
 • या टरबूजची लागवड जपानच्या ईशान्य, आइसलँडमध्ये केली जाते. त्याची किंमतही लाखोंमध्ये आहे.
 • सन २००८ मध्ये या टरबूजचा लिलाव झाला होता. त्यानंतर 6100 डॉलर मध्ये एक टरबूजचा लिलाव झाला. आत्तापर्यंत जर आपण त्याची किंमत पाहिली तर ती 4.35 लाखांपेक्षा जास्त असेल.
रुबीरोमन द्राक्षे
 • विशिष्ट प्रजातींचे द्राक्षे. यांचा आकार सामान्यपणे आढळणाऱ्या द्राक्षांपेक्षा खूप मोठा असतो.
 • याची लागवड जपानच्या इशिकवा प्रांतामध्ये देखील सुरू केली गेली. तेथे २००८ मध्ये प्रथमच ही द्राक्षे पिकविण्यात आली.
 • एका अहवालानुसार एक घड द्राक्षाची किंमत सुमारे ६५ हजार रुपये आहे. २०१६ मध्ये रुबी रोमन द्राक्षाचा लिलाव झाला असल्याची बातमी समोर आली आहे. तेव्हा त्याचा एक घड ८.१४ लाख रूपयाला विकला गेला.

युबरी खरबूज

 • युबरी खरबूज ही खरबूजची एक प्रजाती आहे. खरबूजांच्या बाबतीतच नव्हे तर जगातील कोणत्याही फळांच्या तुलनेत हे सर्वात महाग आहे.
 • जपानच्या सप्पापोरोजवळील होक्काइडो बेटात याची लागवड केली जाते. असे म्हटले जाते की जपानमध्ये जेव्हा कोणाला खूप महागडे गिफ्ट द्यावे लागते तेव्हा ते हे खरबूज एकमेकांना देतात.
 • २०१४ मध्ये युबरी मेलनच्या खरबूज जोडीचा लिलाव सुमारे १६.६४ लाख रुपयाला झाला.
Team Lokshahi News

Share
Published by
Team Lokshahi News
Tags: Densuke Watermelon Garden Pineapple most expensive fruit in the world Ruby Roman Grapes tamale mango Yubari King Melon