Categories: Featured कृषी प्रशासकीय

अतोनात नुकसान होऊनही महाराष्ट्राला केंद्राकडून ‘अपुरा’ मदतनिधी?

नवीदिल्ली। अवकाळी पावसामुळे झालेल्या पिकहानीच्या नुकसानभरपाईसाठी केंद्रसरकारने महाराष्ट्राला साडेनऊशे कोटींचा निधी दिला आहे. तर महाराष्ट्रासह सात राज्यांना मिळून ५९०८ कोटी मिळणार आहेत. यामध्ये सर्वाधिक निधी कर्नाटक राज्याला १८६९ कोटी मिळाला असून मध्यप्रदेशला १७४९ कोटी निधी देण्यात येणार आहे. याबरोबरच आसाम, हिमाचल प्रदेश, त्रिपुरा, आणि उत्तरप्रदेश या राज्यांनाही यातून आर्थिक निधीची तरतूद करण्यात आली आहे. 

महाराष्ट्राला मिळालेला मदतनिधी नुकसानीच्या पटीने खूपच अपूरा असल्याचे जाणकारांचे मत आहे. पूर येऊन गेल्यानंतर केंद्रीय पथकाने पाहणी करण्यासाठी खूप उशिरा केला होता. त्यामुळे नुकसानीची तीव्रता सुरवातीच्या टप्प्यात ज्याप्रमाणात दिसून येत होती ती उशिरा केलेल्या पाहणीमुळे दिसून आली नाही. त्यामुळेही मदतनिधी कमी मिळाला असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. यासाठी केंद्रसरकारने वेळीच घडलेल्या नैसर्गिक आपत्तींची दखल घेऊन पाहणी केल्यास झालेल्या नुकसानीची अचूक तीव्रता ध्यानात येऊन आपत्तीग्रस्ताना योग्य ती मदत मिळणे शक्य होणाऱ आहे. 

मागील वर्षी झालेला अवकाळी पाऊस, ढगफुटी, भुस्खलन यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे देशभरात मोठे नुकसान झाले होते. याचा सर्वाधिक फटका महाराष्ट्र, कर्नाटक, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश, आसाम यासारख्या राज्यांना बसला होता. महाराष्ट्रात कोल्हापूर, सांगली जिल्ह्याला महापूराचा अधिक फटका बसला होता. तर पुणे जिल्ह्यात ढगफुटीने नुकसान झाले होते. यामुळे मोठ्या प्रमाणात पीकहानी आणि वित्तहानी झाल्याने केंद्राकडे नैसर्गिक आपत्तीपोटी भरपाईची मागणी केली होती. यामुळे केंद्रीय पथकांनी पाहणी करून आढावा केल्यानंतर मदतीची शिफारस केली होती. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समितीने राज्यांना अर्थसहाय्याची घोषणा केली असून लवकरच हा निधी राज्यांना उपलब्ध होणार आहे.

  • महाराष्ट्र  – ९५६.९३ कोटी
  • कर्नाटक – १८६९.८५ कोटी
  • मध्यप्रदेश – १७४९.७३ कोटी
  • आसाम –  ६१६.६३ कोटी
  • हिमाचल प्रदेश – २८४.९३ कोटी
  • त्रिपुरा – ६३.३२ कोटी
  • उत्तरप्रदेश – ३६७.१७ कोटी
Team Lokshahi News

Share
Published by
Team Lokshahi News
Tags: flood damage अवकाळी पाऊस कोल्हापूर महापूर मदतनिधी सांगली महापूर