Categories: Featured

सातारा, सांगली जिल्ह्यांसाठी उद्योगातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी दैनंदिन पाससाठी ‘या’ ई-मेलवर करा अर्ज

सातारा, सांगली जिल्ह्यांसाठी उद्योगातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी दैनंदिन पाससाठी ई-मेलद्वारेच अर्ज करावेत प्राप्त अर्जांना 48 तासात मंजुरी मिळणार आहे
महाव्यवस्थापक सतीश शेळके

कोल्हापूर | जिल्ह्यात राहणारे व जिल्ह्याच्या स्थलसीमालगत असणाऱ्या सातारा, सांगली जिल्ह्याच्या औद्योगिक क्षेत्रातील विविध उद्योग व इतर खासगी आस्थापनामध्ये असणाऱ्या अधिकारी-कर्मचारी यांनी दैनंदिन पाससाठी didickolhapur@gmail.com वर आवश्यक कागदपत्रांसह अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक सतीश शेळके यांनी केले.

ई-मेलद्वारे प्राप्त अर्जांचा निपटारा 48 तासात करण्यात येणार आहे. अर्जासोबत पुढील कागदपत्रे आवश्यक आहेत.
* उद्योग घटकांने त्यांच्या लेटरहेडवर केलेला विनंती अर्ज.
* व्यक्ती काम करत असलेल्या आस्थापनांचे प्रमाणपत्र.
* व्यक्ती कोल्हापूर जिल्ह्यातील त्या-त्या तालुक्यातील स्थानिक रहिवासी असल्याबाबत आधार कार्ड किंवा इतर रहिवास पुरावा.
* व्यक्तीचे ओळखपत्र (कंपनीचे आय कार्ड/ वाहन परवाना/ पॅन कार्ड/ पासपोर्ट / बँक पासबुक/ केंद्र तसेच राज्य शासनाने निर्गत केलेले ओळखपत्र)
* औद्योगिक आस्थापनांचे उद्योग आधार नोंदणी / कंपनी नोंदणी प्रमाणपत्र/ जीएसटी प्रमाणपत्र/ शॉप अॅक्ट नोंदणी/ केंद्र, राज्य शासनाने निर्गमित केलेले प्रमाणपत्र
* या कागदपत्रांसह खालील फॉरमॅटमध्ये माहिती एम एस एक्सेलमध्ये इंग्रजीत भरुन didickolhapur@gmail.com वर पाठवावी.
* सर्व पत्रव्यवहार ई-मेलद्वारेच होईल याची नोंद घ्यावी.

Rajendra Hankare