Categories: Featured

माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचे निधन

मुंबई | महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचे वयाच्या ९१ व्या वर्षी पुणे येथे खाजगी रूग्णालयात निधन झाले. मूत्रपिंड निकामी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे. 

शिवाजीराव निलंगेकर पाटील यांची ओळख –
राजकारणातील दिग्गज व्यक्तिमत्त्व. 
०९ फेब्रुवारी १९३१ रोजी निलंगा इथे त्यांचा जन्म झाला. 
हैद्राबाद मुक्तीसंग्रामातील स्वातंत्र्यसैनिक ही ओळख 
एम.ए., एल.एल.बी. पर्यंत त्याचं शिक्षण झालं होतं. 
दादासाहेब या नावाने ते सर्वाना सुपरिचित
राज्याच्या मंत्रिमंडळात विविध खात्याचे मंत्रीपदे त्यांनी लिलया सांभाळली. 

निलंगेकर दिलेली जबाबदारी लिलला पेलत त्यामुळे पक्षाने त्यांच्यावर राज्याचे दहावे मुख्यमंत्री म्हणून जबाबदारी टाकली. ०३ जून १९८५ ते ०६ मार्च १९८६ असे नऊ महिन्यासाठी ते राज्याचे मुख्यमंत्री होते. 

आज निलंग्यात त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. त्यांना कोरोनाचीही लागण झाली होती. दोन दिवसांपूर्वीच कुटुंबीयांनी ते कोरोनातून मुक्त झाल्याचे जाहीर केले होते. निलंगेकर यांना दोन दिवसांपूर्वी डिस्चार्ज मिळाला होता. ते पुण्यात होते. आज सकाळी त्यांचे शव पुण्याहून निलंग्याकडे रवाना होणार आहे. आज दुपारी अंत्ययात्रा निघणार असून आजच अंतिम संस्कार केले जाणार आहेत.

Lokshahi News