Categories: Featured राजकीय सामाजिक

माजी संरक्षण मंत्री जसवंत सिंह यांचे निधन, मोदींनी व्यक्त केला शोक

नवी दिल्ली| अटल बिहारी सरकारमध्ये संरक्षण मंत्री राहिलेले जसवंत सिंह यांचे आज निधन झाले. ८२ वर्षाचे असलेले सिंह दीर्घकाळापासून आजारी होती. त्यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे. मोदींनी त्यांना ट्विटरवरून श्रद्धांजली अर्पण केली.

आपल्या ट्विट मध्ये मोदी म्हणाले,
जसवंतसिंगजी यांनी दीर्घकाळ आपल्या देशाची सेवा केली आहे. प्रथम सैनिक म्हणून आणि नंतर त्यांनी राजकारणात त्यांनी दीर्घकाळ काम केले. अटलजींच्या सरकार मध्ये त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान राहिले आहे. वित्त, संरक्षण क्षेत्राला बळकटी देण्यामध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. त्यांच्या सोबत झालेल्या चर्चा मला कायम लक्षात राहतील.

Lokshahi News