Categories: कृषी बातम्या

‘एफपीओ’ छोट्या शेतकऱ्यांसाठी फायदेशिर

नवी दिल्ली | देशातील लहान आणि सिमांत शेतकऱ्यांच्या शेतमालाला चांगला भाव मिळावा यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील आहे. यासाठी केंद्र सरकारच्या वतीने फार्मर्स प्रोड्यूसर ऑर्गनाएझेशन अर्थात एफपीओ ना सर्वाधिक प्राधान्य दिले जात आहे. परंतु एफपीओचे कामकाज कसे चालते, त्याची स्थापना कशी केली जाते. यामध्ये वैयक्तिकरित्या शेतकऱ्यांचा सहभाग कशा स्वरूपाचा असतो यासंबंधीची माहिती शेतकऱ्यांना होणे गरजेचे आहे.  

एफपीओ ही एक शेतकरी संघटना असून यात शेती करणारे सर्व शेतकरी सहभागी असतात. एफपीओला कंपनीप्रमाणे मानली जाते. तसेच या कंपनीअतर्गत होणारे सर्व व्यवहार आणि त्यातून मिळणारा नफा तोटा सर्व शेतकऱ्यांमध्ये समान वाटला जातो. एफपीओच्या माध्यमातून शेतकऱ्यांना स्वस्त कर्ज, चांगली कृषि उपकरणे आणि इतर अनेक सेवा पुरवल्या जातात. ज्याचा कंपनीचे उत्पन्न वाढविण्यास मदत होते. तसेच शेतकऱ्यांनी पिकवलेल्या शेती उत्पादनांवर प्रक्रिया करून ती बाजारपेठेत विकली जातात. 

भारतात सध्या ७ हजारहून अधिक शेतकरी उत्पादक संस्था (एफपीओ) कार्यरत असून, यातील ५० टक्के केवळ ५ राज्यांतच कार्यरत आहेत. एकट्या पुणे जिल्ह्यात १८५ एफपीओ असून लखनौमध्ये ५० हून अधिक एफपीओ कार्यरत आहेत. अझीम प्रेमजी विद्यापीठाच्या अहवालातून ही आकडेवारी समोर आली आहे. एफपीओ तयार करणे, समाविष्ट शेतकऱ्यांना प्रशिक्षण देणे आणि प्रारंभिक गुंतवणूकीसाठी सरकार १५ लाख रुपयांचे अनुदान देते. याचा शेतकऱ्यांनी लाभ घेणे गरजेचे आहे.

Team Lokshahi News

Share
Published by
Team Lokshahi News
Tags: FPO Fpo मार्गदर्शक सूचना शेतकरी उत्पादक संस्थेसाठी धोरण शेतकरी उत्पादक कंपनी