Categories: Featured आरोग्य

गगनबावडा तालुक्यात आणखी दोघेजण कोरोनाग्रस्त, एकूण रूग्णांचा आकडा चार

गगनबावडा। तालुक्यातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येत सतत भर पडत असून दोन दिवसात तालुक्यातील कोरोनाबाधितांची संख्या ४ वर गेली आहे. आज (गुरुवार) सायंकाळी तालुक्यातील आणखी दोघांचा कोरोना अहवाल पॉजिटीव्ह आला आहे. हे दोघेही वेतवडे गावचे रहिवाशी असून पनवेलमधून परतले होते. आज दिवसभरात तालुक्यात ३ रुग्ण सापडल्याने तालुकावासियांमध्ये चिंतेच वातावरण निर्माण झालय. 

वेतवडे (गगनबावडा) हे २९ वर्षीय दोन्ही रूग्ण १६ मे रोजी खाजगी वाहनाने कोल्हापूरात आले होते. सिपीआर येथे स्वॅब दिल्यानंतर १७ मे रोजी गगनबावडा येथील समाज कल्याण निवासी शाळेच्या कोरोना सेंटरमध्ये कॉरंटाईन केले होते. गुरुवारी सायंकाळी सहा वाजता या दोघांचे रिपोर्ट पॉजिटीव्ह आले आहेत. मंगळवारी अणदूरची महिला, बुधवारी तळये खुर्द मधील युवक तर आज वेतवडेचे दोघे असे चारजण कोरोणाग्रस्त सापडले आहेत. गगनबावडा तालुक्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधितांची वाढणारी संख्या प्रशासन आणि आरोग्ययंत्रणेसाठी चिंताजनक ठरत आहे. अणदूर, तळये खुर्द आणि वेतवडे ही तीनही गावे संसर्ग बाधित घोषित करण्यात आली आहेत.

दरम्यान, कोल्हापूर जिल्ह्यात आज ३६ जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेत. यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या २१८ वर पोहचली आहे. सर्वाधिकर रूग्ण शाहुवाडी तालुक्यात असून तेथील रूग्णांची संख्या ६९ झाली आहे. आज सकाळी १३६८ जणांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने जिल्हावासियांना थोडासा दिलासा मिळाला होता. परंतु सायंकाळी पुन्हा ७ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने चिंता वाढली आहे.

Rajendra Hankare