गगनबावडा | तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असून आज आलेल्या अहवालात आणखी तिघांची भर पडलीय. तालुक्याच्या ठिकाणच्या व्यक्तीचा रिपोर्ट शनिवारी पॉझिटिव्ह आला होता. त्यामुळे त्यांच्या घरातील व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. त्याचा रिपोर्ट आता पॉझिटिव्ह आला आहे. यामुळे तालुक्यातील कोरोनाबाधितांची संख्या १६ वर गेली आहे.
दरम्यान, तालुक्यात कोरोनाग्रस्तांच्या संख्येत सातत्याने भर पडू लागल्याने प्रशासनाची डोकेदुखी वाढू लागली आहे. आज पॉझिटिव्ह आलेल्या कोरोनाबाधितांच्या संपर्कात आणखी कुणी आले आहे का याची खातरजमा करण्याचे काम सध्या सुरू असून जर कुणी संपर्कात आले असेल तर त्यांचे स्वॅब तपासणीसाठी पाठवले जाणार आहेत.