Categories: Featured

गगनबावडा तालुक्यात आणखी ‘सहा’ कोरोनाबाधित

गगनबावडा | तालुक्यात कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढू लागल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. काल उशिरा आलेल्या अहवालात ६ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून तालुक्यातील कोरोनाबाधितांची संख्या ३८ वर गेली आहे. यामध्ये गगनबावडा येथील ४  तर लोंघे येथील २ जणांचा समावेश आहे. 

गगनबावडा येथील एक जण कोल्हापूर येथे कामानिमित्त असल्याचे समजते, त्याचबरोबर आणखी एकजण आधीच्या पॉझिटिव्ह कुटूंबाच्या संपर्कात आल्याची माहिती आहे. लोंघे येथे एकूण तीन जण पॉझिटिव्ह आले असून यातील एकजण कोल्हापूर येथे नोंद आहे. या कोरोनाबाधितांच्या संपर्कात आलेल्या १८ ते २० जणांचे स्वॅब घेण्यात आले असून आणखी काही संपर्कात आले आहेत का याची माहिती घेण्याचे काम सुरू आहे. 

दरम्यान, गगनबावड़ा तालुक्यात कोरोना बाधितांची संख्या ३८ वर गेली असून एकमेकांच्या संपर्कातून हा आकडा वाढल्याचे पहायला मिळत आहे. त्यामुळे सोशल डिस्टंसिंग पाळणे, सॅनिटायझर आणि मास्कचा वापर करणे गरजेचे आहे. 

Team Lokshahi News