Categories: आरोग्य सामाजिक

गगनबावडा : आणखी एका कोरोना रूग्णाची भर, संक्रमणात वाढ सुरूच

गगनबावडा | तालुक्यातील गारीवडे येथील आरोग्यसेविका आणि त्यांच्या कुटूंबातील दोघांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आलाय. यामुळे तालुक्यातील कोरोनाबाधितांची संख्या १३ वर गेलीय. या आरोग्यसेविका गारिवडे येथे कार्यरत असल्या तरी त्यांचा स्वॅब कोल्हापूर येथे घेण्यात आला होता. त्याचबरोबर त्यांच्या कुटूंबातील दोघांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये आरोग्यसेविकेचे पती आणि सून यांचा समावेश आहे. त्यांची नोंद मात्र गगनबावडा तालुक्यात नाही.

दरम्यान आरोग्यसेविकेच्या संपर्कात आलेल्या ७ जणांचे स्वॅब घेण्यात आल्याची माहिती असून त्यांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. तालुक्यात दिवसेंदिवस कोरोनाचा उद्रेक वाढत असून यामुळे प्रशासनाची चांगलीच धावपळ होत आहे. त्यामुळे कोरोनाची साखळी तोडण्यासाठी लोकांनी स्वतःहून काळजी घेणे अतिशय गरजेचे आहे. 

Team Lokshahi News