गगनबावडा | निवडे येथील औषध दुकानदारासह चार जणांना कोरोनाची लागण झाली आहे. औषध दुकानदारासह त्यांच्या कुटुंबातील तिघे, आणि एक कामगार पॉझिटिव्ह आढळला आहे. यामुळे खळबळ उडाली असून निवडे, साळवण परिसरातील गावांमध्ये भितीचे वातारण पसरले आहे.
निवडे येथील औषध दुकानदार यांना त्रास होऊ लागल्यामुळे त्यांनी त्यांच्यासह कुटूंबातील सर्वांची गगनबावडा येथे कोवीड केअर सेंटर मध्ये रॅपीड चाचणी केली. यामध्ये ते चौघेही पॉझीटीव्ह आढळल्यामुळे त्यांना गगनबावडा कोविड सेंटर मध्ये ठेवण्यात आले. तर दुकानातील कामगारांचीही कोरोना चाचणी केली असता त्यातील एकाचा अहवाल पाॅझिटीव्ह आला. यामुळे औषध दुकानदासह पाच जण कोरोना बाधित असल्याचे स्पष्ट झाले. या सर्वांच्या संपर्कात आलेल्या अन्य लोकांची माहिती घेण्याचे काम प्रशासनाने सुरू केले असून या पाचजणांवर गगनबावडा येथे उपचार सुरू आहेत.
कोरोनाच्या पाश्वभूमीवर निवडे साळवण बाजारपेठ प्रत्येक रविवारी बंद ठेवली जाते, निवडे साळवण बाजारपेठेमध्ये कोरोनाबाधित सापडले असले तरी कोरोना बाधित औषध दुकानदारांचे दुकान परिसर वगळता बाजारपेठ सुरू राहणार आहे. बाजारपेठेमध्ये येणाऱ्या नागरिकांनी सुरक्षिता बाळगावी असे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, निवडे- साळवण बाजारपेठेतील कोरोना बाधित रुग्णांचे औषध दुकान सील केले असून, परिसरात निवडे ग्रामपंचातीने औषध फवारणी केली आहे.