Categories: Featured गुन्हे

गगनबावडा : सर्पदंशाने कंत्राटी वायरमनचा मृत्यू

गगनबावडा| महावितरण परिसरात काम करत असताना झालेल्या सर्पदंशाने कंत्राटी कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. कातळी ता. गगनबावडा येथील अकबर काशिम थोडगे (वय२७) असे मृत पावलेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे.

महावितरण परिसरात काम करत असताना सोमवार दि. २० रोजी अकबरला सर्पदंश झाला होता. त्यामुळे त्याला गगनबावडा ग्रामीण रुग्णालयात तात्काळ दाखल केले होते. पण कोणतेही उपचार न करता त्यास कोल्हापूरला पाठविण्यात आले. त्याच्यावर खाजगी रुग्णालयात आठवडाभर उपचार सुरु होते पण सोमवारी मध्यरात्री त्याचा मृत्यू झाला. त्याच्या मागे पत्नी, एक महिन्याचा मुलगा, आई, वडिल, भाऊ, बहिण असा परिवार आहे. घरचा कर्ता मुलगा गमावल्याने कातळी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे

Team Lokshahi News