Categories: आरोग्य सामाजिक

गगनबावडा : मुटकेश्वर येथिल एका दांपत्यासह त्यांच्या संपर्कातील एक कोरोना पॉझिटिव्ह

गगनबावडा | मुटकेश्वर येथिल एका दांपत्यासह त्यांच्या संपर्कातील अन्य एक अशा तिघांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने परिसरात घबराटीचे वातावरण पसरले आहे.

येथिल ६० वर्ष वयाच्या व्यक्तीला गेल्या काही दिवसांपासून ताप येत होता. त्यांच्यावर घरी उपचार चालू होते, मात्र प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने त्यांना कोल्हापूर येथे दाखल करण्यात आले. तेथे त्यांचा स्वॅब घेतला असता त्याचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. तर त्यांच्या संपर्कातील २० लोकांचे स्वॅब घेतले अाहेत. यापैकी त्यांची पत्नी तसेच अन्य एक २५ वर्षीय तरूण व कळे (ता.पन्हाळा) येथील एक जण अशा तिघांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

या तिघांना गगनबावडा येथिल कोविड सेंटरमध्ये ठेवण्यात आले आहे. तर संपर्कातील अन्य लोकांना होमकॉरंटाईन करण्यात आले आहे .

Team Lokshahi News