Categories: गुन्हे

गगनबावडा : धुंदवडे येथे अवैध दारू व्यवसायावर छापा, एकास अटक; पोलिसांची सलग तिसरी कारवाई

गगनबावडा | तालुक्यात सुरू असलेल्या अवैध व्यवसायाविरोधात सहा. पोलीस निरीक्षक संगीता पाटील यांनी धडक मोहीम हाती घेतली आहे. अवैध धंदेवाल्यांविरुद्ध त्यांनी कारवाईचा सपाटाच सुरू केल्याने अवैध व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत. निवडे साळवण आणि खडूळे येथील अवैध दारूचे साठे जप्त करून दोघांना यापूर्वीच अटक करण्यात आली आहे. तर आता धुंदवडे येथील एकाच्या घरी विनापरवाना सुरू असलेला दारू व्यवसाय बंद पाडला आहे. धुंदवडे येथे टाकलेल्या छाप्यात 21840/ रूपये किमतीची दारू आरोपीच्या घरातून जप्त करण्यात आली असून आरोपी तानाजी धोंडीराम पाटील यास अवैध रित्या दारू विक्रीप्रकरणी गगनबावडा पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई सहा पोलीस निरीक्षक संगीता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गगनबावडा पोलीसानी केली आहे. 

नागरिकातून गगनबावडा तालुक्यातील अवैध धंदे बंद करण्याची मागणी सातत्याने करण्यात येत होती. त्यानंतर गगनबावडा पोलिसांनी अवैध व्यावसायिकांविरोधात कारवाईचा सपाटाच लावल्याने नागरिकातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

या कारवाईत पोलिस कॉ. आत्माराम शिंदे, हिंदुराव पाटील, संजय पोवार, अमर चव्हाण यांनी सहभाग घेतला. पुढील तपास सहाय्यक निरिक्षक संगिता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

Team Lokshahi News