Categories: आरोग्य सामाजिक

गगनबावडा : तालुका तहसिलदारांनाच कोरोनाची लागण

गगनबावडा | तालुक्यात कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढत असून आता तालुका तहसिलदारांनाच कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाल्याने तालुक्यातील लोकांची चिंता वाढली आहे. काल सायंकाळी (११ स्पटेंबर) प्राप्त झालेल्या अहवालात तहसिलदार संगमेश कोडे यांच्यासह आणखी तिघांना कोरोनाची लागण झाल्याचे निदान झाले आहे. 

आपल्या कुटूंबाच्या रक्षणासाठी कोणत्याही कंपनीची Corona Virus Helth Policy अवश्य घ्या –
Star Health
Reliance General
AgeOnLife
TataAiG
Maxbupa

यापूर्वी गगनबावडा तालुक्यात महसूल विभाग, आरोग्य विभाग, पोलीस व वनविभागात काम करणारे अधिकारी व कर्मचारी यांचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते. तर आता तालुक्याची संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा सांभाळणाऱ्या तहसीलदारांनाच कोरोनाची बाधा झाल्याने नागरिकांच्यात भितीचे वातावरण आहे. तहसिलदार संगमेश कोडे हे सध्या कोल्हापूरात उपचारासाठी दाखल झाले असून त्यांच्या संपर्कात आलेल्यांना कॉरन्टाईन करण्यात आले आहे.

दरम्यान, बुवाची वाडी येथील एका वृद्धाचा कोरोनाने गुरुवारी मृत्यू झाला होता. तर त्याच्या संपर्कातील दोघांचा अहवाल काल पॉझिटिव्ह आला आहे. सध्या गगनबावडा तालुक्यात २१ रूग्ण कोविडबाधित असून सर्वांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत तालुक्यात ७९ कोरोनाबाधितांची नोंद झाली असून ५८ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

Team Lokshahi News