गगनबावडा : यशवंतराव पाध्ये शैक्षणिक, सांस्कृतिक, धर्मादाय संस्थेच्या ‘यशवंत आदर्श गुरुवर्य’ पुरस्कारांचे वितरण

188

गगनबावडा | शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या यशवंतराव पाध्ये शैक्षणिक, सांस्कृतिक, धर्मादाय संस्थेच्या वतीने आज ‘यशवंत आदर्श गुरुवर्य पुरस्कार’ सोहळा संपन्न झाला. गगनबावडा पोलिस उपनिरीक्षक संगीता पाटील यांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. यावेळी पंचायत समितीचे अधिकारी गांगुर्डे हे देखील उपस्थित होते. 

यशवंतराव पाध्ये शैक्षणिक, सांस्कृतिक, धर्मादाय संस्था गेली सोळा वर्षे कार्यरत आहे. संस्थेच्या वतीने समाजातील विविध घटकांना प्रेरणा देण्यासाठी वर्षभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. त्याच पार्श्वभूमीवर समाजाला घडवण्याचे आणि नव्या पिढीवर संस्कार करण्याचे काम करणाऱ्या गुरूवर्यांचा सन्मान करण्याच्या उद्देशाने आदर्श गुरूवर्य पुरस्काराचे वितरण केले जाते. 

  • यंदाच्या पुरस्काराचे मानकरी 
    • १. के. बी. माने (मुख्याध्यापक) शेणवडे – यशवंत आदर्श गुरुवर्य पुरस्कार
    • २. सर्जेराव मारुती देसाई (अध्यापक) वेसर्डे – यशवंत आदर्श गुरुवर्य पुरस्कार
    • ३. सुरेश कृष्णाजी वरेकर (अध्यापक) असंडोली – यशवंत प्रेरणा पुरस्कार

पुरस्कार्थींची निवड ए.बी.पाटील सर, कुपले सर, पालव सर यांच्या निवड समितीने केली. यावेळी पी. जी. वरेकर यांची कोल्हापूर जिल्हा माध्यमिक शिक्षक व कर्मचारी सहकारी पतपेढीच्या चेरमन पदी निवड झाले बद्दल सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला अनिता भांबुरे, विश्वनाथ पोतदार, वैदेही पाध्ये, दीपक घाडगे सर, जामदार सर, गवळी सर, बर्गे सर, गणपतराव भांबूरे, जाधव सर, बिक्कड सर, गोसावी सर आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैष्णवी श्रीकृष्ण पाध्ये, तर आभार वृंदा श्रीकृष्ण पाध्ये यांनी मानले.