Categories: गुन्हे

गगनबावडा पोलिसांची सलग दुसरी कारवाई; खडुळे येथे अवैध मद्यतस्करी प्रकरणी एकास अटक

गगनबावडा | गगनबावडा पोलिसांनी तालुक्यातील अवैध व्यावसायिकांविरोधात धडक मोहिम उघडल्याने अवैध व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत. काल (दि. १३ स्पटेंबर) पोलिसांनी निवडे साळवण येथे सुरू असलेल्या अवैध दारू अड्यावरील छाप्या पाठोपाठ आज खडुळे येथे अवैधरित्या दारूचा साठा बाळगल्याप्रकरणी एकास अटक केली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कारवाईत भारत पाटील (वय ३०)  रा. खडुळे यास ताब्यात घेतले आहे. सदर आरोपी कोल्हापूर गगनबावडा रोडवर शिवम चायनीज सेंटरच्या बाजूला होंडा अॅक्टिवा गाडीच्या डिक्कीत मद्याच्या बाटल्यांसहित पकडला गेला आहे. हे मद्य त्याने स्वतःच्या फायद्याकरिता आणल्याचे आढळल्याने होंडा अॅक्टिवा गाडीसहित १७ हजार ३७४ रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. 

तालुक्यात सुरू असलेल्या अवैध व्यावसायिकांविरोधात पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारल्याने नागरिकांच्यातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. या कारवाईत सहाय्यक पोलिस निरिक्षक संगिता पाटील यांच्यासह पोलिस कॉ. जगदीश वीर, संदीप घाटगे, शहाजी दुर्गुळे, संजय पोवार, पाटील यांनी सहभाग घेतला. आरोपीस मंगळवारी (१५ स्पटेंबर) न्यायालयात हजर केले जाणार असून पुढील तपास गगनबावडा पोलिस करीत आहेत.

Team Lokshahi News