Categories: कला/संस्कृती सामाजिक

हातकणंगले येथे गणेशोत्सव आणि मोहरम भक्ती भावाने साजरा

हातकणंगले।१० सप्टेंबर। येथे गणेशोत्सव आणि मोहरमचा सण भक्ती भावाने साजरा करण्यात आला. हिंदू मुस्लीम ऐक्याचे प्रतिक असलेल्या मोहरमची सांगता आज ताबुत विसर्जनाने झाली. येथील बाबुजमाल तालीम, मोती तालीम, गोरी बादशाह दर्गा, सिध्दार्थ तालीम या ठिकाणी स्थापन केलेल्या पंजाना ग्रामस्थांबरोबरच तालमींच्या शेकडो कार्यकर्त्यांनी ढोलताशाच्या निनादात भावपुर्ण निरोप दिला. 

हातकणंगले येथे मोहरमचा सण मोठया उत्साहात साजरा केला जातो. ताबुत विसर्जनाच्या दिवशी नकटी सोंगाची प्रथा अनेक वर्षांची आहे. बाबुजमाल तालीम व मोती तालीम यांच्या वतीने नकटीच सोंग काढण्यात आले. यात युवकांचा सहभाग मोठ्या प्रमाणात होता. भिल्लाच्या वेषभूषे बरोबरच रामायण, राक्षस आदि वेशभूषा साकारण्यात आली. संध्याकाळी पंजे विसर्जन मिरवणूकीनंतर मोठ्या भावपूर्ण वातावरणात पंजाचे विसर्जन करण्यात आले.

यंदा गणेशोत्सवासह मोहरमचा सण एकत्र आल्याने उत्साहाचे वातावरण पहायला मिळाले. येथे मोहरमची अनेक दशकांची परंपरा आहे. यात ग्रामस्थांसह येथील तालीम मंडळाचा उत्स्फूर्त सहभाग होता.  

Team Lokshahi News

Share
Published by
Team Lokshahi News
Tags: गणेशोत्सव पंजे विसर्जन मोहरम हातकणंगले