Categories: Featured अर्थ/उद्योग महिला

महिलांनो घरबसल्या FSSAI चा परवाना घ्या आणि सुरू करा तुमचा आवडता व्यवसाय

ग्रामीण भागातील महिलांसाठी ही महत्त्वाची बातमी आहे. विशेषत ज्या महिला लोणचं बनवण्यात हुशार आहेत. जर तुमच्या हाताला लोणचं बनविण्याची कला अवगत असेल तर ही बातमी नक्की वाचा. यामुळे तुम्हाला नक्की फायदा होणार. त्यातच सध्या कच्चा कैऱ्या, करवंद, आवळा, माईनमुळा, लिंबू हा कच्चामाल देखील मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. त्यामुळे घरच्याघरी लोणचं बनवून त्यातून पैसा कमावण्याची चांगली संधी तुम्हाला उपलब्ध आहे.

छोट्या पातळीवर सुरू करा आपला व्यवसाय

लोणचं बनिवण्याचं काम सुरू करण्याआधी छोट्या छोट्या म्हणजे कमी प्रमाणात लोणचं बनवा. भारतातील सर्वच राज्यात लोणचं खाल्लं जात. लोणच्याला सर्वच राज्यात मागणी असते. त्यामुळे लोणचं बनविण्याचा व्यवसाय टाकून पैसा कमावण्याचा मार्ग उत्तम आहे. विशेष म्हणजे हा इतर दुसऱ्या व्यवसायासारखा हंगामी नाही. लोणच्याची मागणी प्रत्येक राज्यात आणि प्रत्येक हंगामात असते. कैरीच्या लोणच्याप्रमाणे लसूण, मुळा, मिरची, गाजर, लिंबू, आवळा, अद्रक, चिंच यापासून बनलेल्या लोणच्यालाही अधिक मागणी आहे.

कमीत कमी जागेत सुरू होतो व्यवसाय

अगदी एका खोलीतही हा व्यवसाय तुम्ही सुरू करु शकता. फक्त तुमच्याकडे लोणंची तयार करून त्याला सुकवण्यासाठी आणि पॅक करण्यासाठी साधने हवीत. ज्या जागेवर आपण लोणंचे तयार करत आहात ती जागा स्वच्छ आहे का याची खात्री करावी.  हा व्यवसाय सुरू करण्यासाठी FSSAIकडून परवाना घ्यावा लागतो. एफएसएसएआयचा परवाना तुम्ही ऑनलाईन डाऊनलोड करून मिळवू शकता.

डाऊनलोड केलेल्या अर्जात आपली माहिती द्यावी लागेल. नाव, जागा, पत्ता, मोबाईल नंबर, व्यवसायाचा प्रकार आदीची माहिती द्यावी लागेल. अर्ज भरण्यासाठी आपण https://www.fssailicense.org/ लिंकवर क्लिक करावे. त्यानंतर अर्ज डाऊनलोड करून आपला अर्ज करू शकता.

Team Lokshahi News