Categories: आरोग्य सामाजिक

कोल्हापूर : गांधीनगर मध्ये जाताय.. थांबा.. हा परिसर केलाय सील..!

कोल्हापूर | करवीर तालुक्यातील मौजे गांधीनगर परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधित रुग्ण आढळत असल्याने गांधीनगर येथील तनवाणी कॉर्नर ते चिंचवाड रेल्वे फाटक या दरम्यान येणारा भाग व त्यालगतचा परिसर सीमाबंद करून प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्याचे आदेश करवीर उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी वैभव नावडकर यांनी आज दिलेत.

या आदेशात म्हटले आहे, सद्यस्थितीत कोरोना या विषाणूचा संसर्ग व प्रादूर्भाव पसरण्याची शक्यता लक्षात घेता त्यावर तात्काळ नियंत्रण करणे व कोराना विषाणूचे संसर्ग रोखण्याकरिता त्यावर प्रतिबंधात्मक उपाय-योजना आखणे आवश्यक आहे. कोरोना विषाणूच्या प्रसाराचे माध्यम पाहता या विषाणूची लागण एका संक्रमित रूग्णाकडून अन्य व्यक्तीस, इसमास त्याच्या संपर्कात आल्याने होते.

भारतीय साथ रोग नियंत्रण अधिनियम – 1897 व जागतिक आरोग्य संघटना यांच्याकडील दिशा निर्देशानुसार करवीर तालुक्यातील मौजे गांधीनगर येथील तनवाणी कॉर्नर ते चिंचवाड रेल्वे फाटक या दरम्यान येणारा भाग व त्यालगतच्या परिसर नकाशात दर्शविलेनुसार या भागातील उपविभागीय दंडाधिकारी करवीर उपविभाग कोल्हापूर यांच्या आदेशाने प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषीत करण्यात येत आहे व या क्षेत्राच्या चारही बाजूच्या सर्व रस्त्यांच्या सीमा सिलबंद करण्यात येत आहेत.

Team Lokshahi News