Categories: बातम्या राजकीय

गोकुळ निवडणूक : विरोधी आघाडीचे सुजित मिणचेकर, अमर पाटील, बयाजी शेळके विजयी

कोल्हापूर | कोल्हापूर जिल्हा दूध संघाच्या अत्यंत चुरशीच्या निवडणूकीत विरोधी गटाने जोरदार मुसंडी मारली आहे. आत्तापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार इतर मागासवर्ग प्रवर्गातून अमर यशवंत पाटील (कोडोली) व माजी आमदार डॉ. सुजित मिणचेकर तर भटक्या विमुक्त प्रवर्गातून बयाजी शेळके यांनी विजय मिळवला आहे.  

कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या निवडणुकीसाठी मंगळवारी सकाळी आठपासून कसबा बावडा येथील शासकीय बहुउद्देशीय हॉल येथे मतमोजणीस सुरूवात झाली असून  दुसऱ्या फेरीतही विरोधी गट आघाडीवर आहे. 

गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत पहिले तीन निकाल राजर्षी शाहू शेतकरी आघाडीच्या बाजूने लागले आहेत. पालकमंत्री सतेज पाटील आणि ग्रामविकास मंत्री हसनमुश्रीफ यांच्या नेतृत्वाखाली विरोधी आघाडी एकवटली आहे. या आघाडीचे  उमेदवार अमरसिंह पाटील हे ४३६ मतांनी विजयी झालेत, डॉ सुजित मिणचेकर हे ३४६ मतांनी तर बयाजी शेळके हे २३९ मतांनी विजयी झाले आहेत.

सध्या महिला प्रवर्गातील उमेदवारांमध्ये चुरस असून सुमारे १०० मतांचे मताधिक्य विरोधी आघाड़ीच्या उमेदवारांनी घेतले आहे . गोकुळच्या मतमोजणी महिला गटात जोरदार रस्सीखेच सुरू आहे . दुसऱ्या फेरीअखेर शौमिका महाडिक , अनुराधा पाटील , स्मिता पाटील पिछाडीवर असून आतापर्यंत मोजलेल्या नऊशे मतांमध्ये विरोधी आघाडीच्या अंजना रेडेकर यांनी आघाडी घेतली आहे . 

गोकुळच्या निवडणुकीसाठी गटातील मतमोजणीला प्रारंभ झाला असून महिला ओबीसी अनुसूचित जाती आणि नागरिकांचा मागास प्रवर्ग गटातून पालकमंत्री सतेज पाटील- कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखालील विरोधी आघाडीच्या दिशेने कौल दिसू लागला आहे . हे निकाल सत्तातंराचे संकेत आहेत काय  या विषयीही पश्चिम महाराष्ट्रात ऊत्सुकता शिगेला पोहचली आहे.

Team Lokshahi News