सातारा । महाराष्ट्रातील प्रसिध्द शिक्षण संस्था असलेल्या रयत शिक्षण संस्थेच्या इंग्रजी माध्यम शाळेच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण 107 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत. इच्छूक आणि पात्र उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीसाठी उपस्थित राहावे.

मुलाखतीची तारीख – दिनांक 2 जून 2022 रोजी मुलाखतीकरिता स्वखर्चाने उपस्थित राहावे.

पदाचे नाव –
मुख्याध्यापक, प्राथमिक शिक्षक, उच्च प्राथमिक शिक्षक, माध्यमिक शिक्षक, ATD शिक्षक,  के.जी. शिक्षक, क्रीडा शिक्षक, कला आणि संगीत शिक्षक, संगणक शिक्षक आणि समन्वयक पदाच्या जागा

मुलाखतीचा पत्ता –
अण्णासाहेब कल्याणी विद्यालय कॅम्प, सातारा ता. जि. सातारा.
आप्पासाहेब भाऊराव पाटील इंग्लिश मीडियम स्कूल, सातारा, ता. सातारा जि.सातारा.

अधिक माहितीसाठी – क्लिक करा 
अधिकृत वेबसाईट – rayatshikshan.edu