Categories: Featured कृषी

महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील ‘पात्र’ शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, सहकार विभागाने सुरु केली ‘ही’ प्रक्रिया

मुंबई। राज्यात निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमाफी योजेनतील पात्र शेतकऱ्यांची कर्जमुक्तीची प्रक्रिया निधी अभावी खोळंबली होती. गुरूवार (२१ मे) रोजी पार पडलेल्या राज्यस्तरीय खरीप आढावा बैठकीत याविषयी चर्चा झाली असून आता लवकरच पात्र शेतकऱ्यांची कर्जमुक्ती केली जाणार आहे. अद्यापही कर्जमाफीचा लाभ न मिळालेल्या महाराष्ट्रातील तब्बल ११ लाख १२ हजार शेतकऱ्यांची कर्जमाफी खोळबंली आहे. यासर्व पात्र शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या याद्या तयार झाल्या असून लवकरच त्यांना कर्जमाफीचा लाभ दिला जाणार आहे.

यासाठी, सहकार विभागाने आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया सुरु केली आहे. मार्च महिन्यानंतर राज्यात उद्भवलेल्या परिस्थितीमुळे महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती प्रक्रियेला ब्रेक लागला होता. आता सहकार विभागाने शेतकरी कर्जमाफीबद्दलच्या थांबलेल्या प्रक्रियेला सुरवात केली आहे. सरकारची परवानगी मिळताच पात्र लाभार्थ्यांच्या याद्या अपलोड करून लगेचच शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा केली जाणार आहे. तर, थकीत कर्जदार शेतकऱ्यांबरोबरच नियमीत कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांसाठी देखील पन्नास हजार रुपयांचं प्रोत्साहनपर अनुदान दिलं आहे. त्याचीही प्रक्रिया लवकरच सुरू होणार असून याबाबतचा आदेशही लवकरच निघणार असल्याची माहिती आहे. 

महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेसाठी महाराष्ट्रातील ३२ लाख शेतकरी पात्र ठरले होते. यापैकी १९ लाख शेतकऱ्यांच्या कर्जखात्यावर मार्च अखेरपर्यंत १२ हजार कोटी रूपये वर्ग करण्यात आले आहेत, तर निधी अभावी ११ लाख १२ हजार खातेदारांना ८,१०० कोटींचा लाभ देणे अद्याप बाकी आहे. याबरोबरच नियमित कर्ज फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना देखील प्रोत्साहनपर अनुदान म्हणून ५० हजार रूपये दिले जाणार असल्याची माहिती राज्यसरकारच्या वतीने देण्यात आली आहे. ही सर्व प्रक्रिया लवकरच पूर्ण करण्याचा सरकारचा मानस असून खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांना कर्जमुक्त केले जाणार आहे.

Team Lokshahi News

Share
Published by
Team Lokshahi News
Tags: PM KIsan pm kisan samman nidhi yojana 2020 किसान सम्मान निधि योजना पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी पीएम किसान योजना लिस्ट पीएम किसान सन्मान निधी योजना पीएम किसान सम्मान निधि योजना पीएम-किसान योजना प्रधानमंत्री किसान सम्मान निधि योजना महात्मा जोतिबा फुले कर्जमाफी योजना महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजना महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना महात्मा फुले कर्ज माफी यादी महात्मा फुले कर्ज माफी योजना शेतकरी सन्मान निधी योजना यादी