नागपूर | नॅशनल फायर सर्व्हिस कॉलेज, नागपूर (National Fire Service College Nagpur) अंतर्गत रिक्त जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (NFSC Nagpur Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. उपसंचालक, सहायक संचालक, लेखाधिकारी या पदांसाठी ही भरती (Jobs in Maharashtra) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावरऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 जुलै 2022 असणार आहे.

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव
उपसंचालक (Deputy Director) – या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी सायन्स क्षेत्रात पदवी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. किंवा उमेदवारांकडे फायर इंजिनिअरिंगची पदवी असणं आवश्यक आहे. किंवा उमेदवारांनी डिव्हिजनल फायर सर्व्हिसचा कोर्स केला असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान पाच वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. 

सहायक संचालक (Director) – या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी सायन्स क्षेत्रात पदवी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी स्टेशन ऑफिसर इन्स्ट्रक्टर कोर्स केला असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान तीन वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. 

लेखाधिकारी (Accounts Officer) – या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही क्षेत्रात पदवी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.

अर्ज करण्यासाठीचा पत्ता
संचालक, राष्ट्रीय अग्निशमन सेवा महाविद्यालय, भारत सरकार, गृह मंत्रालय, टाकळी फीडर रोड, राजनगर, नागपूर-440013
अधिक माहितीसाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी – क्लिक करा
या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी http://www.nfscnagpur.nic.in/ या लिंकवर क्लिक करा