Categories: Featured

PM किसान योजनेतील शेतकऱ्यांसाठी खुशखबर…

नवी दिल्ली | देशातील जवळपास १० कोटी शेतकरी वर्गासाठी आनंदाची बातमी आहे. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेतून शेतकऱ्यांच्या खात्यावर २ हजार रूपयांचा सहावा हप्ता येत्या दोन दिवसात जमा होणार आहे. केंद्र सरकारने घोषित केल्याप्रमाणे १ ऑगस्ट पासून शेतकऱ्यांच्या खात्यात हा निधी वितरित केला जाणार आहे. पीएम किसान योजनेच्या तिसऱ्या वर्षातील हा दुसरा हप्ता असणार आहे. यापूर्वी सरकारने डिसेंबर २०१८ ते मार्च २०१९ या वर्षात ४.५ कोटी शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा लाभ दिला होता. तर आर्थिक वर्ष एप्रिल २०१९ – मार्च २०२० मध्ये ८ कोटी ५२ हजार शेतकऱ्यांना लाभ दिला आहे. यानंतर आर्थिक वर्ष २०२०-२१ साठी एप्रिल ते जुलै साठी ८ कोटी ५२ लाख ९८ हजार ४०९ शेतकऱ्यांच्या खात्यावर प्रत्येकी २ हजार रूपयांचा लाभ दिला आहे. 

जर तुम्ही २०२० – २१ या आर्थिक वर्षात नोंदणी केली असेल तर तुम्हाला येत्या ऑगस्टमध्ये पीएम किसान योजनेचा हप्ता मिळू शकतो. तर काहींना एप्रिल ते जुलै दरम्यान हा हप्ता मिळाला आहे. पीएम किसान योजनेच्या लाभार्थी यादीत तुमचे नाव असल्याची खात्री करून घेणे गरेजेचे आहे. यासाठी तुम्ही पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा https://pmkisan.gov.in/ या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन फार्मर्स कॉर्नरवर जाऊन https://pmkisan.gov.in/BeneficiaryStatus.aspx या ठिकाणी माहिती घेऊ शकता. तुमचा मोबाईल नंबर, आधार नंबर, किंवा बॅंक खाते नंबरवरून ही माहिती एका क्लिकवर तुम्हाला मिळवता येते. आपल्या वैयक्तीक खात्याच्या माहितीबरोबर पीएम किसान योजनेतील लाभार्थी शेतकऱ्यांची त्यांच्या गावनिहाय यादीचा तपशील देखील https://pmkisan.gov.in/Rpt_BeneficiaryStatus_pub.aspx या ठिकाणी पाहता येतो. याबरोबरच आधार डिटेल्स मध्ये अथवा इतर काही दुरूस्त्या करायच्या असतील तर आधार अपडेट मध्ये जाऊन त्याही तुम्हाला करता येतील. 

सध्या देशातील लॉकडाऊनची स्थिती विचारात घेता सर्वच लोकांची आर्थिक स्थिती ढासळल्याचे स्पष्ट होत आहे. यापार्श्वभूमीवर देशातील शेतकऱ्यांना पीएम किसान ही योजना खूप लाभदायक ठरली आहे. लॉकडाऊनच्या काळात जवळपास साडेआठ कोटी शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेच्या माध्यमातून थेट आर्थिक मदत मिळाली आहे. त्याचबरोबर किसान क्रेडीट कार्डसारखी योजनाही पीएम किसान योजनेतील शेतकऱ्यांसाठी सरकारने उपलब्ध करून दिली आहे. ज्यायोगे शेतकऱ्यांना कोणत्याही तारणाशिवाय १ लाख ६० हजारापर्यंतचे कर्ज उचलता येते.

Team Lokshahi News

Share
Published by
Team Lokshahi News
Tags: 6000 ruppees PM KISAN SAMMAN YOJANA buy insurance Farmer loan get insurance Insurance KISAN SAMMAN YOJANA online crop loan ONLINE PM KIsan PM KISAN LIST PM KISAN LIST 2019 PM KISAN LIST 2020 PM KISAN SAMMAN NIDHI YOJANA PM KISAN SAMMAN NIDHI YOJANA 2019 PRADHAN MANTRI KISAN SAMMAN NIDHI YOJANA 2019 एलजी डायरेक्टरी किसान सम्मान निधि योजना पीएम किसान पीएम किसान निधि योजना पीएम किसान पोर्टल पीएम किसान योजना लिस्ट पीएम किसान समाधान योजना पीएम किसान सम्मान निधि योजना पीएम किसान सम्मान योजना लिस्ट पीएम-किसान योजना प्रधानमंत्री किसान निधि योजना फार्म प्रधानमंत्री किसान सम्मान निधि योजना मोदी सरकार मोदी सरकार की योजना