Categories: Featured

सुकन्या समृध्दी, PPF, आरडी आणि EPF खातेधारकांसाठी आनंदाची बातमी

Public Provident Fund (PPF), Sukanya Samriddhi Yojana (SSY), Recurring Deposit (RD)

नवी दिल्ली। देशातील लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर लोकांना पैशाची असणारी गरज ध्यानात घेऊन सरकारने सुकन्या समृध्दी, PPF, आरडी आणि EPF खातेधारकांसाठी नियमात बदल करून सवलती दिल्या आहेत. कर्मचारी भविष्य निर्वाह निधीतून ग्राहकांना आपल्या खात्यातून ७५ टक्के रक्कम किंवा ३ महिन्याचा पगार यापैकी जे कमी असेल ते काढण्याची मुभा दिली आहे. EPFO ने यासंदर्भात ग्राहकांना मोबाईलवर संदेश पाठवण्यात आले असून यामध्ये कोविड-१९ शी संबंधित दाव्यांकरता अर्जांवर प्राधान्य तत्वावर प्रक्रिया केली जात असल्याचे स्पष्ट केले आहे.

सरकारने नुकतेच ईपीएफ योजनेशी संबंधित तरतुदींमध्ये बदल केले असून या दुरूस्तीनंतर ग्राहकांना पीएफ रक्कमेचा काही भाग नॉन-रिफंडेबल आगाऊ रक्कमेच्या स्वरूपात काढण्याची परवानगी दिली आहे. तर आता कोविड-१९ दाव्याअंतर्गत अर्जांवर प्राधान्य तत्वावर प्रकिया केली जाणार आहे. यापूर्वी कोणत्याही अन्य दाव्यांसाठी अर्ज केला असल्यास आणि त्याचे समाधान झाले नसल्यास तरीदेखील कोविड-१९ अंतर्गत ऑनलाईन अर्ज दाखल करता येणार आहे. अन्य दाव्यांवर प्रक्रिया सुरू आहे. मात्र लॉकडाऊनमुळे याला विलंब लागत असल्याने आपण आम्हाला सहकार्य कराल असे ईपीएफओने आपल्या संदेशात म्हणटले आहे. 

सरकार भरणार तीन महिन्यांचा पीएफ

सध्याच्या परिस्थीतीत ईपीएफओने ग्राहकांना आणखी एक संदेश पाठवला असून या संदेशात सरकार तीन महिन्यांसाठी पीएफ भरणार असल्याचे सांगितले आहे. भारत सरकार पुढील ३ महिन्यांसाठी कंपनी आणि कर्मचाऱ्यांचे (प्रत्येकाच्या १२ टक्के) योगदान देईल. कंपनीत जर १०० कर्मचारी असतील आणि त्यातील ९० टक्के लोकांना १५००० रूपयांपेक्षा कमी पगार असल्यास ही रक्कम जमा केली जाणार आहे. याचा फायदा देशभरातील एकूण ४ कोटी ८० लाख नोकरदार वर्गाला होणार आहे. याचा फायदा देशातील ४ कोटी ८० लाख नोकरदारांना होणार आहे.

PPF, आरडी, सुकन्या समृध्दी खातेधारकांसाठी आनंदाची बातमी

वित्त मंत्रालयाने शनिवारी ट्विटरवरून दिलेल्या माहितीनुसार पीपीएफ, आरडी आणि सुकन्या समृध्दी खात्यात किमान ठेव जमा करण्याची मुदत ३ महिन्यांनी वाढवली आहे. त्यामुळे आता खातेधारकांना या योजनांमध्ये ३० जून पर्यंत पैसे जमा करण्याची सवलत मिळणार आहे. लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आल्याचेही या ट्विटमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे.

Team Lokshahi News

Share
Published by
Team Lokshahi News
Tags: biz Business कर्मचारी भविष्य निधि personal finance News PPF ppf account bank ppf account benefits ppf account interest ppf account online ppf account rules ppf calculator 2019 ppf interest rate 2020 PPF Payment Last Date ppf rules ppf withdrawal ppf calculator bob RD Recurring Deposit SSY SSY Payment Last Date Sukanya Samriddhi Yojana Sukanya yojana ईपीएफ कर्मचारी ईपीएफओ पोर्टल लॉगिन कर्मचारी कर्मचारी भविष्य निधि अधिनियम कर्मचारी भविष्य निधि खाता कर्मचारी भविष्य निधि योजना कर्मचारी भविष्य निधि योजना 1995 कर्मचारी भविष्य निधि हेल्पलाइन नंबर पीपीएफ भविष्य निधि भवन सुकन्या पेंशन योजना सुकन्या योजना 2019 सुकन्या योजना कैलकुलेटर सुकन्या योजना डाकघर सुकन्या योजना फॉर्म सुकन्या समृद्धि योजना 2020 सुकन्या समृद्धि योजना अपडेट