goat farming
पशुपालन हा केवळ भारतातच नव्हे तर जगभरात जलदगतीने वाढणारा कृषी व्यवसाय आहे. शेती नंतर, पशुसंवर्धन हा शेतकर्यांच्या उत्पन्नाचा दुसरा सर्वात महत्वाचा प्रमुख स्त्रोत आहे. गुरेढोरे, शेळ्या, मेंढरं यांच्या पालनातून शेतकरी सहजपणे चांगले उत्पन्न मिळवू शकतात किंवा त्यांची कमाईची क्षमता दुप्पट करू शकतात. हीच बाब लक्षात घेऊन केंद्र सरकार व राज्य सरकार शेतकऱ्यांना अधिकाधिक प्रोत्साहन देण्यासाठी विविध योजना राबवित आहेत. (Goat/Sheep/ Pig farming scheme)
अलीकडे, केंद्र सरकारने मेंढी, बकरी आणि डुक्कर पालन अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. खरं तर मेंढ्या, बकरी आणि डुक्कर संगोपन प्रमाण सुधारण्याच्या उद्देशाने उत्तर प्रदेश राज्यात पशुसंवर्धन विभागाच्या देखरेखीखाली राबविण्यात येणारी ‘ग्रामीण बॅकयार्ड मेंढी, शेळी व डुक्कर पालन योजना’ सुरू करण्यात आली. त्याच धर्तीवर केंद्रसरकार इतर राज्यातही शेळीमेंढीपालन आणि डुक्करपालनासाठी प्रोत्साहन देत आहे.