Categories: कृषी

खुशखबर : PM Kisan Yojana; कोट्यावधी शेतकऱ्यांच्या खात्यात ‘या’ दिवशी जमा होणार पैसे

नवी दिल्ली | पंतप्रधान मोदींनी देशभरातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी दिली आहे. सरकारची महत्वाकांक्षी योजना असलेल्या पीएम किसान योजनेचा यंदाच्या आर्थिक वर्षातील तिसरा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरच जमा होणार आहे. पीएम ऑफिसने केलेल्या ट्विटनुसार या योजनेचा हप्ता अटलबिहारी वाजपेयी यांच्या जन्मदिनी अर्थात २५ डिसेंबर रोजी  ट्रान्सफर केला जाणार आहे. 


पंतप्रधान नरेंद्र मोदी एखादा महत्वाचा दिवस बघूनच शेतकऱ्यांच्या खात्यात पीएम किसान योजनेचे पैसे जमा करण्याचा प्रयत्न करतात. त्याचप्रमाणे त्यांनी यावेळी अटलबिहारी वाजपेयी यांच्या जन्मदिनाचा मुहुर्त साधला आहे. यादिवशी देशातील कोट्यावधी शेतकऱ्यांच्या खात्यात एकाचवेळी पैसे जमा केले जाणार आहेत.

हप्ता मिळण्यापूर्वी तपासा रेकॉर्ड –
1. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेची अधिकृत वेबसाइटला ‘शेतकरी कॉर्नर’ टॅब क्लिक करावे लागेल.
2. आपण यापूर्वी अर्ज केला असेल आणि तुमचा आधार योग्य प्रकारे अपलोड झाला नसेल किंवा काही कारणास्तव आधार क्रमांक चुकीच्या पद्धतीने प्रविष्ट केला गेला असेल तर त्याची माहिती त्यात सापडेल.
3. शेतकरी कॉर्नरमध्ये पीएम किसान योजनेंतर्गत शेतकऱ्यांना नावनोंदणी करण्याचा पर्यायही देण्यात आला आहे.
4. यात शासनाने सर्व लाभार्थ्यांची संपूर्ण यादी अपलोड केली आहे. आपल्या अर्जाची स्थितीकाय आहे. याबाबत आधार क्रमांक / बँक खाते / मोबाइल नंबरद्वारे शेतक-यांना माहिती मिळू शकते.
5. या योजनेचा लाभ देण्यात आलेल्या शेतक-यांचीनावेराज्य / जिल्हानिहाय / तहसील / गावानुसार पाहिली जाऊ शकतात.

Lokshahi News

Share
Published by
Lokshahi News
Tags: 6000 ruppees PM KISAN SAMMAN YOJANA buy insurance Farmer loan get insurance Insurance KISAN SAMMAN YOJANA online crop loan ONLINE PM KIsan PM KISAN LIST PM KISAN LIST 2019 PM KISAN LIST 2020 PM KISAN SAMMAN NIDHI YOJANA PM KISAN SAMMAN NIDHI YOJANA 2019 Pradhan Mantri Kisan Samman Nidhi Yojana