Categories: कृषी बातम्या

मधमाशीपालनासाठी सरकार देतयं भरघोस अनुदान; तर ‘या’ठिकाणी मिळतयं शास्त्रीय प्रशिक्षण

पुणे | शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न वाढविण्यासाठी सरकार विविध पातळीवर प्रयत्न करत आहे. यामध्ये शेतीबरोबरच शेतीपूरक व्यवसाय शेतकऱ्यांनी करावेत यासाठी सरकारी पातळीवर प्रोत्साहन दिले जात आहे. या शेतीपूरक व्यवसायांमध्ये प्रक्रिया उद्योगांचाही समावेश असून यासाठी सरकारी पातळीवर विविध योजनांच्या माध्यमातून अनुदानही दिले जाते. मधमाशी पालन हा असाच एक शेतीपूरक व्यवसाय असून यासाठी राज्य सरकारच्या महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळामार्फत मध केंद्र योजना कार्यान्वित केली आहे.

शासनाच्या मधमाशीपालन योजनेचा लाभ घेऊन यशस्वी झालेल्या शेतकऱ्याच्याच तोंडून ही माहिती ऐका आणि मधमाशीपालनातून लाखो रूपयांचा नफा कसा मिळतो हे देखील जाणून घ्या. त्याचबरोबर शासनाच्या योजना आणि प्रशिक्षण कुठे मिळेल हे देखील पहा.

या योजनेचा फायदा घेण्यासाठी पात्र असलेल्या व्यक्ती, संस्थांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या योजनेचे खास वैशिष्ट्य म्हणजे या योजनेमध्ये मध उद्योगांचे मोफत प्रशिक्षण दिले जाते. मध उद्योगामध्ये लागणाऱ्या साहित्यासाठी सरकारकडून 50 टक्के अनुदान दिले जाते. (स्वतःची गुंतवणूक 50 टक्के) तयार मधाची हमीभावाने खरेदी केली जाते. तसेच मधमाशांच्या संरक्षण व संवर्धनाची जनजागृती इत्यादी बाबी या योजनेमध्ये अंतर्भूत आहेत.

Team Lokshahi News

Share
Published by
Team Lokshahi News
Tags: beekeeping beekeeping equipment beekeeping in india beekeeping slideshare beekeeping supplies beekeeping videos honey beekeeping how to start beekeeping importance of beekeeping भारतात मधमाशी पाळणे मध उद्योग मराठी मधमाशी पालन मधमाशी पालन उपकरणे मधमाशी पालन करणारे व्हिडिओ मधमाशी पालन कसे सुरू करावे मधमाशी पालन पुरवठा मधमाशी पालन पेटी मधमाशी पालन स्लाइडशेअर मधमाशी माहिती मराठी मधमाशीपालन अनुदान मधमाश्या पाळण्याचे महत्त्व मधुमक्षिका पालन केंद्र पुणे मधुमक्षिका पालन केंद्र महाबळेश्वर