Categories: कृषी बातम्या

भाजीपाला रोपवाटिकेसाठी शासन देतयं तब्बल २ लाख ३० हजारांचे अनुदान, ‘या’ठिकाणी करा अर्ज..!

कोल्हापूर | शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करण्याच्या उद्देशाने कृषि विभागाच्या माध्यमातून विविध योजना राबवल्या जात आहेत. याच उद्देशाने राष्ट्रीय कृषि विकास योजनेंतर्गत ’भाजीपाला रोपवाटिका’ स्थापन करण्यासाठी अनुदान दिले जात आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर भाजीपाला रोपवाटिका योजनेंतर्गत टोमॅटो, वांगी, कोबी, फुलकोबी, मिरची, कांदा इ. व इतर भाजीपाला पिकांसाठी रोपवाटिका उभारणी करणेसाठी अनुदान दिले जात आहे.

यासाठी इच्छूकांनी आपले अर्ज mahadbtmahait.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन किंवा तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे सादर करावेत, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी ज्ञानदेव वाकुरे यांनी केले आहे.

  • अनुदान –
    • रोपवाटिकेसाठी 10 गुंठे क्षेत्रावरील 3.25 मी. उंचीच्या (फ्लॅट टाईप) शेडनेटगृह उभारणीसाठी येणाऱ्या खर्चाच्या 50 टक्के किंवा जास्तीत-जास्त रक्कम 1 लाख 90 हजार रू.
    • प्लॅस्टीक टनेलकरिता येणाऱ्या खर्चाच्या 50 टक्के किंवा जास्तीत-जास्त रक्कम 30 हजार रू.
    • पॉवर नॅकसॅक स्प्रेअर करिता येणाऱ्या खर्चाच्या 50 टक्के किंवा जास्तीत-जास्त रक्कम 3 हजार 800 रू.
    • प्लास्टिक क्रेटस करिता येणाऱ्या खर्चाच्या 50 टक्के किंवा जास्तीत-जास्त रक्कम 6 हजार 200 रू. असे एकूण 2 लाख 30 हजार रूपये पर्यंत अनुदानाचा लाभ या योजनेमध्ये देय आहे.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी स्वत:च्या मालकीची किमान 0.40 हे (7/12 वरील नोंदीनुसार) जमीन व पाण्याची कायमची सोय असलेले शेतकरी पात्र आहेत. यामध्ये महिला कृषि पदवीधर यांना प्रथम, महिला गट / महिला शेतकरी यांना व्दितीय तसेच भाजीपाला उत्पादक अल्प व अत्यल्प भूधारक शेतकरी/ शेतकरी गट यांना तृतीय याप्रमाणे प्राधान्यक्रम राहिल. लक्षांकापेक्षा जादाचे अर्ज प्राप्त झाल्यास सोडत काढून योजनेची अंमलबजावणी मार्गदर्शक सुचनेनुसार करण्यात येईल. योजनेच्या मार्गदर्शक सुचना http://www.krishi.maharashtra.gov.in या वेबपोर्टलवर उपलब्ध आहेत.

Team Lokshahi News

Share
Published by
Team Lokshahi News
Tags: agriculture department how to start a vegetable nursery maharashtra govt subsidy for vegetable nursery vegetable nursery management vegetable nursery near vegetable nursery plants vegetable nursery subsidy vegetable nursery training