पुणे | आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ कार्डिओ-थोरॅसिक सायन्सेस (AICTS) पुणे (Army Institute of Cardio-Thoracic Sciences Pune) अंतर्गत रिक्त जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (AICTS Pune Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे.

पूर्व प्राथमिक शिक्षक, सहाय्यक शिक्षक, संगीत शिक्षक, नृत्य शिक्षक आणि मेड या पदांसाठी ही भरती (Jobs in Maharashtra) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या ई-मेल आयडीवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख  03 जून 2022 आहे.

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव
पूर्व प्राथमिक शिक्षक (Pre Primary Teacher), सहाय्यक शिक्षक (Assistant Teachers) या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी Graduate/ Post Graduate, NTT / B.Ed Training पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

संगीत शिक्षक (Music Teacher) – या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून B.Ed Training in Light Music पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

नृत्य शिक्षक (Dance Teacher) – या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून Diploma in Dance, Computer Knowledge B.Ed पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

मेड (Maid). – या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी इयत्ता 5वी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

अर्ज करण्यासाठीचा ई-मेल आयडीappsmhctcpune@mail.com वर पाठवावा.
अधिक माहितीसाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी – क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी https://afmc.nic.in/ या लिंकवर क्लिक करा

या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://afmc.nic.in/ या लिंकवर क्लिक करा.