मुंबई | सरकारी नोकरी हे अनेकांचं स्वप्न असतं. मात्र बऱ्याचदा अशा सरकारी नोकऱ्या कोण कोणत्या ठिकाणी उपलब्ध आहेत याची वेळीच माहिती न मिळाल्याने अशा संधी सोडाव्या लागतात. त्यासाठीच आम्ही आपल्याला सरकारी नोकऱ्यांची वेळीच माहिती देण्याचा प्रयत्न करीत आहोत. खालील ठिकाणी सरकारी नोकरीच्या चांगल्या संधी उपलब्ध आहेत. इच्छूक आणि पात्र उमेदवारांनी यासाठी त्वरित अर्ज करणे गरजेच आहे.

आयडीबीआय बँक(IDBI Bank) 
इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडियामध्ये (IDBI Bank Recruitment 2022) असिस्टंट मॅनेजर आणि एक्झिक्युटिव्ह या पदांसाठी भरती सुरू आहे. देशभरात एकूण 1544 जागांसाठी ही भरती (IDBI Bank Recruitment) होत आहे. सिलेक्ट झालेल्यांना काँट्रॅक्ट बेसिसवर काम करावं लागेल. यासाठी अर्जाची फी 1000 रुपये आहे. अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख 17 जून आहे.

बॉर्डर सिक्युरिटी फोर्स (BSF)
बॉर्डर सिक्युरिटी फोर्स, म्हणजेच बीएसएफमध्ये (BSF Recruitment) सब इन्स्पेक्टर (SI), काँस्टेबल (CT) आणि हेड काँस्टेबल (HC) या पदांसाठी भरती सुरू आहे. एकूण 281 जागांसाठी ही भरती होत आहे. या ठिकाणी सिलेक्ट होण्यासाठी उमेदवारांना दोन टप्पे पार करावे लागणार आहेत. पहिल्या टप्प्यात एक लेखी परीक्षा असणार आहे, तर दुसऱ्या टप्प्यात डॉक्युमेंटेशन, फिजिकल मेजरमेंट, फिजिकल एफिशिअन्सी टेस्ट, ट्रेड टेस्ट आणि मेडिकल चाचणी असणार आहे. यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 जून आहे.

इंडियन बँक (Indian Bank)

इंडियन बँकेमध्ये स्पेशालिस्ट ऑफिसर्सच्या 312 पदांसाठी भरती (Indian Bank Recruitment) सुरू आहे. यामध्ये सीनियर मॅनेजर, चीफ मॅनेजर आणि असिस्टंट मॅनेजर्सचा समावेश आहे. उमेदवाराला अर्ज पाहून थेट मुलाखत किंवा लेखी परीक्षा आणि मग मुलाखत अशा पद्धतीने भरती केलं जाईल. अर्जाची फी खुल्या श्रेणीतल्या उमेदवारांसाठी 850 रुपये, तर राखीव श्रेणीतल्या उमेदवारांसाठी 175 रुपये आहे. अर्ज दाखल कऱण्याची शेवटची तारीख 14 जून आहे.

नॉर्थ ईस्ट फ्रंटिअर रेल्वे (North East Frontier Railway)
नॉर्थ ईस्ट फ्रंटिअर रेल्वेमध्ये (North East Frontier Railway Recruitment) मशीनिस्ट, इलेक्ट्रिशियन, प्लंबर अशा विविध जागांसाठी APPRENTICESHIP म्हणून भरती (Railway Recruitment) सुरू आहे. विशेष म्हणजे, तब्बल 5,636 जागांसाठी ही भरती घेण्यात येत आहे. कटिहार & टीडीएच वर्कशॉप, रंगिया, तीनसुकिया, अलीपुरदौर आणि दिब्रुगढ अशा ठिकाणच्या वर्कशॉपमध्ये नेमणूक करण्यात येणार आहे. या ठिकाणी थेट भरती करण्यात येत असून, यासाठी कोणतीही परीक्षा घेण्यात येणार नाही. यासाठी 30 जून रोजी रात्री 10 वाजेपर्यंत अर्ज दाखल करता येईल.

जेएसएससी (JSSC)
झारखंड स्टाफ सिलेक्शन कमिशनमध्ये (JSSC Recruitment 2022) क्लार्क आणि स्टेनोग्राफर या पदांसाठी 991 जागांवर भरती (JSSC Recruitment) होत आहे. यातल्या 964 जागा क्लार्क, तर 27 जागा स्टेनोग्राफर पदासाठी आहेत. यासाठी उमेदवारांची लेखी चाचणी, टायपिंग टेस्ट आणि कम्प्युटर नॉलेज टेस्ट घेण्यात येईल. स्टेनोग्राफर पदासाठी 25,500 ते 81,100 या रेंजमध्ये पगार असेल, तर क्लार्क पदासाठी 19,900 ते 63,200 या रेंजमध्ये पगार असेल. या पदांसाठी अर्ज दाखल कऱण्याची अंतिम तारीख 19 जून आहे.