मुंबई| पदवीधर व शिक्षक मतदार संघ निवडणुकीचे मतदान आज दि. 1 डिसेंबर रोजी होत आहे. महाराष्ट्रातील पदवीधर व शिक्षक मतदारांना त्यांचे नाव मतदार यादीत शोधण्यासाठी निवडणुक आयोगाने चांगला पर्याय उपलब्ध करून दिला आहे.
घरबसल्या महाराष्ट्रातील मतदारांना आपले मतदान केंद्र कोणते आहे हे सहजरित्या ऑनलाईनच्या माध्यमातून पाहता येईल.
यासाठी मतदारांनी 👉🏻 Graduates’ and Teachers’ Constituency या लिंकवर आपले नाव कोणत्या मतदान केंद्रात आहे याची खात्री करावी.
पुणे पदवीधर मतदार संघातील मतदारांना https://kolhapur.gov.in/ या संकेतस्थळावर आपले नाव कोणत्या मतदान केंद्रात समाविष्ट आहे याची माहिती मिळू शकेल.
पदवीधर व शिक्षक मतदार संघ निवडणुकीत लोकशाही बळकट करण्यासाठी सर्व मतदारांनी आपला पवित्र मतदानाचा हक्क बजवावा, असे आवाहन कोल्हापूरचे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी केले आहे.