कोल्हापूर। राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज जिल्हा प्रशासनाच्यावतीने दसरा चौकातील राजर्षी शाहुंच्या पुतळ्यास जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी पुष्पहार अर्पण करुन विनम्र अभिवादन केले. यावेळी जिल्हा पुरवठा अधिकारी दत्तात्रय कवितके, मराठा महासंघाचे अध्यक्ष वसंतराव मुळीक, राजदीप सुर्वे, शाहू स्मारक भवनचे व्यवस्थापक कृष्णाजी हारुगडे, अनिल म्हमाणे, युवराज कदम आदी उपस्थित होते. तत्पूर्वी शाहू स्मारक भवन येथील राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्यासही जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.