Categories: बातम्या

पालकमंत्री सतेज पाटील यांना कोरोनाची लागण; ट्विट करून म्हणाले…

कोल्हापूर | पालकमंत्री सतेज पाटील यांना कोरोनाची (Corona) लागण झाली आहे. सतेज पाटील यांनी ट्विट करुन याबाबत माहिती दिली आहे. कोरोनावर मात करुन लवकरच आपल्या सेवेसाठी हजर होईन, असेही त्यांनी या ट्विटमध्ये म्हणटले आहे.

गेल्या काही दिवसांपासून कोल्हापूरात कोरोनाची साथ आटोक्यात आल्याचे पहायला मिळत होते. परंतु आज पालकमंत्री सतेज पाटील यांनाच कोरोनाची लागण झाल्याने कोल्हापूरात खळबळ उडाली आहे.

पाटील यांनी स्वतःला झालेल्या कोरोनाच्या प्रादुर्भावाविषयी माहिती देताना डॉक्टरांच्या सल्ल्याने मी उपचार घेत असून लवकरच तुमच्या सेवेसाठी हजर होईन असे सांगत कोल्हापूरकरांना दिलासा दिला आहे. पाटील यांचे पुतणे आमदार ऋतुराज पाटील यांना देखील काही महिन्यांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. उपचारानंतर ते कोरोनामुक्त झाले आहेत.

Team Lokshahi News