Categories: Featured राजकीय

हसन मुश्रीफ, सतेज पाटील, राजेंद्र यड्रावकरांना मिळाली ‘ही’ खाती

कोल्हापूर। ५ डिसेंबर। कोल्हापूर जिल्ह्याचे राज्याच्या मंत्रीमंडळात तीन मंत्री असून आज जाहीर झालेल्या मंत्रीमंडळाच्या खातेवाटपात या तीन मंत्र्यांना ठाकरे सरकारमध्ये महत्वाच्या खात्यांचा कार्यभार मिळाला आहे. 

राष्ट्रवादी कॉंग्रेसपक्षाचे हसन मुश्रीफ यांना महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये ग्रामविकास खात्याचा कार्यभार मिळाला असून ते कॅबिनेट मंत्री आहेत. तर कॉंग्रेसच्या सतेज पाटील यांच्याकडे गृहराज्यमंत्री (शहर) पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. सतेज पाटील यांनी आघाडी सरकारच्या काळात देखील याच खात्याची जबाबदारी सांभाळली होती. याबरोबरच शिवसेनेच्या कोट्यातून मंत्रीपद मिळवणारे अपक्ष आमदार राजेंद्र पाटील- यड्रावकर यांच्याकडे आरोग्य, सांस्कृतिक, अन्न औषध प्रशासन (राज्यमंत्री) खात्याची धुरा देण्यात आली आहे. 

सरकारचे खातेवाटप जाहीर!

मंत्रीमंडळ विस्तारानंतर कोणत्या मंत्र्याला कोणते खाते मिळणार यावरून राजकीय चर्चांना जोर आला होता. अखेर शनिवार (४ जानेवारी) रात्री मंत्रीमंडळ खातेवाटपाची यादी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे पाठवण्यात आली होती. त्याला मंजूरी मिळाली असून खातेवाटप जाहीर करण्यात आले आहे. 

  • हसन मियालाल मुश्रीफ – ग्रामविकास (कॅबिनेट)
  • सतेज उर्फ बंटी डी. पाटील – गृह (शहरे), गृहनिर्माण, परिवहन, माहिती तंत्रज्ञान, संसदीय कार्य, माजी सैनिक कल्याण (राज्यमंत्री)
  • राजेंद्र श्यामगोंडा पाटील यड्रावकर – सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण, वैद्यकीय शिक्षण, अन्न व औषध प्रशासन, वस्त्रोद्योग, सांस्कृतिक कार्य (राज्यमंत्री)
Team Lokshahi News

Share
Published by
Team Lokshahi News
Tags: कॉंग्रेस खातेवाटप खातेविस्तार ठाकरे सरकार ठाकरे सरकार खातेवाटप महाराष्ट्र सरकार खातेवाटप महाविकास आघाडी राजेंद्र यड्रावकर राष्ट्रवादी शिवसेना सतेज पाटील हसन मुश्रीफ