Categories: राजकीय

हातकणंगले : राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने व्यंकय्या नायडू यांच्या वक्तव्याचा निषेध

हातकणंगले | राज्यसभा खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी खासदारकीची शपथ घेतल्यानंतर दिलेल्या जय भवानी जय शिवाजी या घोषणेवर उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी आक्षेप घेतल्याबद्दल हातकणंगले तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने व्यंकय्या नायडू यांचा आज जाहिर निषेध करण्यात आला.

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख व जिल्हाध्यक्ष रोहित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हातकणंगले तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने व्यंकय्या नायडू यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी संपूर्ण तालुक्यातून जय भवानी जय शिवाजी लिहुन १००० पत्र पाठवण्याचे ठरवले असून आज प्रातिनिधिक स्वरूपात पदाधिकाऱ्यांनी पत्र पाठवली आहेत. दरम्यान पेठवडगाव, हुपरी, हातकणंगले, इचलकरंजी येथून देखील पत्र पाठविण्यात आली आहेत.

यावेळी विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कल्पेश चौगुले. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे हातकणंगले तालुकाध्यक्ष संतोष वडेर, हातकणंगले विधानसभा अध्यक्ष अजित मोरे, इचलकरंजी विधानसभा अध्यक्ष प्रसाद अनुरकर, इचलकरंजी शहर अध्यक्ष युवराज शिंगाडे , नागेश शेजाळे विद्यार्थीचे शहराध्यक्ष संकेत बागल, अथर्व जाधव यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

Team Lokshahi News