Categories: Featured

तर… ‘या’ ५०० रूपयाच्या नोटेचे ‘त्याला’ मिळाले असते ‘लाखो’ रूपये

मुंबई। स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एटीएममधून ५०० रुपयांची नंबर नसलेली नोट एका ग्राहकाला मिळाली. विशेष म्हणजे ही नोट नीट कापलेलीही नाही. मुंबईतील फोर्ट येथील स्टेट बँकेच्या शाखेत हा प्रकार घडला असून संबधित ग्राहकाने बॅंकेत धाव घेत आपली नोट बदलून घेतलीय. 

स्टेट बँक ऑफ इंडियाच्या फोर्ट शाखेतील एटीएममधून गुरुवारी एका व्यक्तीने १० हजार रुपये काढले. या १० हजार रुपयांच्या नोटांमध्ये त्याला ५०० रुपयांची एक नोट अशी मिळाली की, जिच्यावर नंबरच छापलेला नाही, तसेच या नोटेचे कटींगही व्यवस्थित झालेले नाही. ही नोट हाती आल्यानंतर बनावट नोटांच्या भितीमुळे घाबरलेल्या ग्राहकाने बँक कर्मचाऱ्यांकडे धाव घेतली. 

बँक कर्मचाऱ्यांनी सदर व्यक्तीकडून सर्व माहिती जाणून घेत त्याला ५०० रुपयांची नोट बदलून दिली. एसबीआयच्या शाखेतील कर्मचारी निवृत्ती मराडे यांनी ही माहिती दिली आहे. अशी त्रुटी असलेली नोट आरबीआयच्या करन्सी विभागाकडे जमा केली जाते. त्यानंतर आरबीआय अशा त्रुटी असलेल्या नोटेच्या बदल्यात संबंधिताला तीन पट पैसे दिले जातात.

ही नोट सदर व्यक्तीने बॅंकेला परत न करता ‘संग्रहीत’ करून ठेवली असती तर भविष्यात त्याला या नोटेची लाखो रूपये किंमत मिळाली असती. विविध प्रकारच्या करन्सीचा संग्रह करणाऱ्या शौकिन लोकांकडून अशा नोटांना अधिक किमंत देऊन खरेदी केली जाते. 

Team Lokshahi News